रामराजे शिंदे, नवी दिल्ली
ट्रेनी IAS पूजा खेडकर यांच्याविरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मोठी कारवाई केली आहे. यूपीएससीच्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बनावट कागदपत्रे, अपंगत्व आणि IT कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पूजाने बनावट कागदपत्रे बदलून UPSC परीक्षा निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळा दिली. बनावट ओळखीच्या आधारे UPSC मध्ये निवड झाल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्याविरुद्ध आहे.
पूजा खेडकरची उमेदवारी का रद्द करू नये? अशी कारणे दाखवा नोटीस देखील यूपीएससीने बजावली आहे. याशिवाय पूजा खेडकर यांना यापुढे कोणतेही परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. यूपीएससीने पूजा खेडकर प्रकरणात सखोल तपास केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तपासाअंती यूपीएससीने हे निष्कर्ष काढले आहेत. यामध्ये पूजा खेडकरने जास्त वेळा परीक्षा दिल्या आहेत. यूपीएससी परीक्षेचे नियम डावलून त्यांनी परीक्षा दिल्या आहेत.
पूजा खेडकर यांनी ओळखपत्र बदलून आणि आई-वडीलांचे आणि स्वतःचे नाव बदलून परीक्षा दिल्या. ई मेल आयडी, पत्ता, मोबाईल नंबर आणि सही सुद्धा बदलली, असं यूपीएससीला तपासात आढळलं आहे.
(नक्की वाचा - ठरलं तर मग! जागांसाठी शिवसेना आक्रमक, मित्रपक्षांचे टेन्शन वाढले)
राज्य सरकारनेही केंद्राला सादर केला अहवाल
राज्य सरकारने देखील केंद्राकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आठवड्याच्या चौकशीनंतर अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गराडे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने पूजा खेडकर यांच्याबाबत अहवाल तयार केला. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या एक सदस्यीय समितीलाही या अहवालाची प्रत पाठवण्यात आली आहे.
(नक्की वाचा - Microsoft सर्व्हर डाऊन : मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन का झाले? मोठं कारण आलं समोर)
खेडकर यांनी सेवांमध्ये रुजू होण्यापूर्वी केलेल्या विविध दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी केला गेला आहे. यामध्ये त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्रे याचा समावेश आहे. या आधारेच त्यांनी ओबीसी आणि पीडब्ल्यूबीडी कोट्याचे फायदे मिळवले होते. त्याच बरोबर त्यांच्या आई-वडिलांची पार्श्वभूमीही या अहवालात समाविष्ट करण्यात आली आहे.