Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! हगवणे माय-लेकाचा पोलीस घेणार ताबा

जेसीबी खरेदी प्रकरणात मोठी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. प्रशांत येळवंडे यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणी आता दोघांवरही कारवाई केली जाणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे कुटुंबाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या येरवडा तुरुंगात असलेल्या  शशांक हगवणे आणि आई लता हगवणे यांना आता म्हाळुंगे पोलीस अटक करणार आहेत. जेसीबी विक्री प्रकरणात फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात ही कारवाई होणार आहे. उद्या येरवडा तुरुंगातून पोलीस आई-लेकाचा ताबा घेणार असून न्यायालयाने तशी परवानगीही दिली आहे. काय आहे हे प्रकरण? वाचा..

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे प्रकरण?

वैष्णवी हगवणे प्रकरणात सध्या अटकेत असलेला वैष्णवीचा दीर शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. शशांक हगवणे आणि लता हगवणे या माय-लेकाने जेसीबी खरेदी प्रकरणात मोठी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. प्रशांत येळवंडे यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणी आता दोघांवरही कारवाई केली जाणार आहे. 

 मार्च 2022 पासून ऍडव्हान्स आणि कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी प्रशांत यांनी 11 लाख 70 हजार रुपये लता हगवणेंच्या खात्यावर टाकलेत. मात्र काही महिन्यानंतर बँकेने प्रशांत यांच्याकडून जेसीबी मशीन ताब्यात घेतली. त्यानंतर हे प्रकरण म्हाळुंगे पोलिसात गेले. मात्र तिथेही मामा पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी या प्रकरणात ही हस्तक्षेप केला.

(नक्की वाचा-  ST White paper : एसटी महामंडळाकडून 8 दिवसात काढली जाणार श्वेतपत्रिका)

जालिंदर सुपे यांच्या हस्तक्षेपामुळे तेव्हा अपेक्षित कारवाई झाली नाही  असा आरोप तक्रारदार प्रशांत येळवंडे यांनी केला आहे. वैष्णवीच्या प्रकरणानंतर मात्र जागे झालेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि जेसीबी ताब्यात घेतली. आता न्यायालयाने अटकेची परवानगी दिल्याने उद्या म्हाळुंगे पोलीस येरवडा तुरुंगातून हगवणे आई-लेकाला ताब्यात घेणार आहेत.

(नक्की वाचा - Naxalite : बसवराजूनंतर सुरक्षा दलाला आणखी एक यश; 10 लाखांचं बक्षीस असलेला एक बडा नक्षलवादी ठार)