Vande Bharat Express : नागपूर ते पुणे आणि मुंबई मार्गावरही धावणार वंदे भारत एक्स्प्रेस, कधीपासून होणार सुरू?

या मार्गांवर रेल्वे प्रशासनाच्या वतीने चाचणी पूर्ण झाली असल्याचे मध्ये रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. चाचणीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यावर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करता येऊ शकेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

संजय तिवारी, प्रतिनिधी

नागपुर ते पुणे तसेच नागपूर ते मुंबई यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस लवकर सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रवाशांचा एक ते दीड तासांचा वेळ वाचू शकणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रवाशांकडून ही मागणी केली जात होती. लवकरच या मार्गावरुन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या मार्गांवर रेल्वे प्रशासनाच्या वतीने चाचणी पूर्ण झाली असल्याचे मध्ये रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. चाचणीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यावर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करता येऊ शकेल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा यांनी सांगितले आहे. नुकतीच नागपूर आणि भुसावळ विभागातील खासदारांची बैठक घेण्यात आली. यावेळी खासदारांनी मागणी केली असता, मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी त्यांच्यावर माहिती सांगितली.

नक्की वाचा - GST Scam : नागपूर बोगस GST बिल घोटाळ्याला नवीन वळण, तपासात धक्कादायक माहिती उघड

नागपूर-पुणे-नागपूर सेवा आठवड्यातून सहा दिवस असू शकेल. आठवड्यात एक दिवस देखभाल आणि दुरुस्तीसाठी राखीव असेल, असे यावेळी सांगण्यात आले. पुणे येथून सध्या तीन वंदे भारत एक्सप्रेस धावतात. सोलापूर, कोल्हापूर आणि हुबळी या तीन स्थानांशी पुणे शहर वंदे भारत एक्सप्रेस द्वारे जोडल्या गेल्या आहेत. 

Advertisement