मनोज सातवी, वसई:
Mumbai Ahmedabad Highway Accident: गेल्या काही दिवसांपासून राज्यात भीषण अपघातांचे सत्र सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये देवदर्शनाला जाताना कारचा भीषण अपघात झाला होता ज्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा जीव गेला. ही घटना ताजी असतानाच मुंबई–अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे.
वेगाने केला घात...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वसईजवळ चिंचोटी परिसरात एका भरधाव वेगातील स्पोर्ट्स बाईकचा भीषण अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक दिल्याने झालेल्या या दुर्घटनेत पादचाऱ्यासह दुचाकीवरील दोघा तरुणांचा मृत्यू झालाय. दुचाकीचा वेग आणि धडक इतकी जोरदार होती की लोखंडी रेलिंग तोडून दुचाकी दुसऱ्या बाजूला जाऊन पडली.
Nashik Crime: आणखी 3 मुली बेपत्ता! नाशिकमध्ये अपहरण सत्र थांबेना, पालकांमध्ये भितीचे वातावरण
स्पोर्ट्स बाईकचा अपघात, तिघांचा मृत्यू
विरार येथील शाहरूख खान हा सुझुकी हायाबुसा बाईकवर मित्र अर्जुन शेट्टी (२५) याच्यासोबत घरी परतत असताना साधना हॉटेलजवळ रस्ता ओलांडणाऱ्या ईश्वर साव (१९) याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बाईक सुमारे १०० मीटर दूर फेकली गेली. पादचारी ईश्वर साव याचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या शाहरूख आणि अर्जुन यांचाही काही वेळात मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भरधाव वेग पुन्हा एकदा जीवघेणा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
Nagpur Factory Blast: नागपुरात भयंकर दुर्घटना! भीषण स्फोटात 15 जणांचा मृत्यू; 18 कामगार जखमी