मनोज सातवी, वसई:
Vasai Virar Municiple Corporation Election 2026: वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीने ७१ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी भाजपाने ऑपरेशन लोटस राबवून बविआचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केली आहे. बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मात्र या चर्चेचा खरपूस समाचार घेतला आहे. "असले धंदे करू नका, आधीच लोकांनी तुम्हाला धडा शिकवला आहे.आता हे नायते धंदे करीत बसले, तर लोकं शेण घालतील तुमच्या तोंडात" असा इशारा हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाला दिला आहे. माझा एकही नगरसेवक कुठेही जाणार नाही, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
वसई विरारमध्ये भाजपचे ऑपरेशन लोटस...
वसई विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत बविआने ७० जागा मिळवल्या तर, कॉग्रेसची १ जागा घेत 71 जागा घेत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. मात्र भाजपाला सत्ता मिळवता आली नसली तरी, 44 नगरसेवक निवडून आणून मोठा विक्रम केला आहे. तसेच बहुजन विकास आघाडीचे संभाव्य 16 बंडखोर नगरसेकांचा गट फोडण्यासाठी "ऑपरेशन लोटस" सुरू केल्याची चर्चा आहे.
शिवाय बविआचे नेते, आणि प्रथम महापौर राजीव पाटील भाजपाच्या संपर्कात असून त्यांनी भाजप उमेदवाराचा प्रचार केला होता.त्यामुळे राजीव पाटील यांना हाताशी धरून ही खेळी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची सूत्रांनी माहिती आहे. शिवाय राजकारणात काहीही होऊ शकते असे सूचक विधान भाजपचे प्रवक्ते मनोज बारोट यांनी केले आहे.
दरम्यान, बहुजन विकास आघाडीने निवडणुकीत बहुमत जरी मिळवले असले तरी अंबरनाथ नगरपरिषदे प्रमाणे भाजपने डाव खेळून 16 जणांचा गट फोडून वसई विरार महानगरपालिकेची सत्ता काबीज केली तर नवल वाटायला नको.