Pune News: पुणे जिल्हा काँग्रेसचा आधारस्तंभ निखळला; माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Anantrao Thopte Passed Away: पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Anantrao Thopte Passed Away: पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष रुजवण्यासाठी थोपटेंनी आयुष्य वेचले
पुणे:

अजिंक्य धायगुडे-पाटील, प्रतिनिधी

Anantrao Thopte Passed Away: पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते अल्पशा आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

भोर विधानसभा मतदारसंघाचे खंबीर नेतृत्व

अनंतराव थोपटे यांनी पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्षे नेतृत्व केले. या भागाच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष रुजवण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी थोपटे यांनी स्वत:चे संपूर्ण आयुष्य वेचले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतरच्या काळात त्यांनी काँग्रेस विधीमंडळ गटनेते म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News: पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाची क्षमता संपली! 88 टक्के ट्रॅक फुल्ल, वाचा काय होणार प्रवासावर परिणाम )

वसंतदादांच्या मंत्रिमंडळात मिळाली पहिली संधी

अनंतराव थोपटे यांचा राजकीय प्रवास दीर्घ राहिला आहे. त्यांना 1983 मध्ये पहिल्यांदा मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली होती. विशेष म्हणजे, दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतरच त्यांना हे महत्त्वाचे पद मिळाले होते. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली.

अनेक महत्त्वाच्या खात्यांचा यशस्वी कारभार

आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनंतराव थोपटे यांनी विविध महत्त्वाच्या खात्यांचा पदभार यशस्वीपणे सांभाळला. यामध्ये प्रामुख्याने  
उच्च व तंत्रशिक्षण,मदत व पुनर्वसन, परिवहन आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय रोजगार हमी योजना आणि फलोत्पादनखालील खात्यांचा समावेश होता.

( नक्की वाचा : विधानपरिषदेच्या 5 जागांचा निकाल निश्चित, आता उर्वरित 12 जागांवर कोण भिडणार? वाचा सर्व लढतींचे गणित एकाच ठिकाणी )
 

याशिवाय, त्यांनी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक म्हणूनही काम पाहिले होते. त्यांच्या निधनामुळे एका अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे.
 

Topics mentioned in this article