मुंबई:
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये माढा मतदारसंघातून अभिजीत पाटील, मुलुंडमधून संगिता वाजे, मोर्शीतून गिरीश कराळे, पंढरपूरमधून अनिल सावंत आणि मोहोळमधून राजू खरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
यापूर्वी २४ ऑक्टोबर रोजी शरद पवार गटाने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर 26 ऑक्टोबरला 22 उमेदवारांची दुसरी यादी, 26 ऑक्टोबरला 9 उमेदवारांची तिसरी यादी, 27 ऑक्टोबरला 7 उमेदवारांची चौथी यादी तर आज पाच उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे.
Advertisement
पहिली यादी - 45
दुसरी यादी - 22
तिसरी यादी - 9
चौथी यादी - 7
पाचवी यादी - 5
यावरुन आतापर्यंत शरद पवार गटाने एकूण 88 उमेदवारांची घोषणा केली आहे.