Beed Leopard Terror News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झालीय. नागरिकांना भरदिवसाही घराबाहेर पडणं कठीण होतंय. बिबट्याच्या भीतीने लोकांनी घरातून बाहेर पडणं जवळपास बंदच केलंय. पुण्यानंतर आता बीडमधील स्थानिक धास्तावले आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टी शहरामध्ये एका रस्त्यावर बिबट्या दोन पिल्लांसह दिसला. यानंतर वन अधिकाऱ्यांनी स्थानिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय.
स्थानिकांना रात्री उशीरा घराबाहेर न पडण्याचं आवाहन | Beed Leopard Viral Video
मंगळवारी (9 डिसेंबर 2025) रात्रीच्या वेळेस रेकॉर्ड करण्यात आलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गाडीच्या लाइट आणि आवाजामुळे तीनही बिबट्या (Bibtya Terror News) शेताच्या दिशेने पळून गेल्याचे दिसतंय. या व्हिडीओमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. परिक्षेत्र वन अधिकारी अमोल मुंडे यांनी सांगितले की, किन्ही गावाजवळ एक बिबट्या दोन पिल्लांसह दिसला. यानुसार किन्ही गावासह आसपासच्या परिसरात म्हणजे बीडसांगवी, कोहिनी, बावी आणि दारेवाडीतील लोकांना उशीरा रात्री घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय.
तसेच सार्वजनिक सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना केल्या जातील, असेही आश्वासन वन अधिकारी मुंडे यांनी दिले.
(नक्की वाचा: Pune News: पुणेकरांची धाकधूक वाढली, त्या दहशतीमुळे घराबाहेर पडण्याचीही भीती; दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम)