सौरभ वाघमारे, सोलापूर: बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील कथित मुख्य सुत्रधार आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. बीडसह, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिक कराडची संपत्ती आढळून आल्याने खळबळ उडाली असून आता विदेशातही त्याची संपत्ती असल्याची चर्चा आहे. अशातच सोलापूरमध्येही वाल्मिक कराडने पत्नी ज्योती जाधवच्या नावाने मोठी मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतोष बीड हत्या प्रकरणावरुन आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडबाबत एक मोठा दावा केला आहे. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावावर 4 जमिनीचे सातबारा असल्याचे ट्विट सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केले होते. अंजली दमानियांच्या या दाव्यानंतर बार्शी तालुक्यातील शेंद्री गावातील न ज्योती मंगल जाधव यांच्या मालकीच्या जमिनीची एनडीटीव्ही मराठीने चौकशी केली.
या चौकशीमध्ये वाल्मिक कराडची वे सोलापूर जिल्ह्यात देखील कोट्यावधी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधवच्या नावे खरेदी करण्यात आले असून त्यांचे क्षेत्रफळ साधारण 35 एकर इतके आहे तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतके आहे.
( नक्की वाचा : तरुणांमध्ये वाढत असलेला Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात? )
दोन वर्षाच्या कालावधीत ह्या चार ही जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. या आधी ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यात दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलेलं होते. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत देखील कोट्यावधी रुपयांची शेतजमीन खरेदी केल्याचे दिसते आहे. त्यामुळे वाल्मिक कराडची संपत्ती नेमकी किती? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
अंजली दमानियांच्या ट्वीटमध्ये काय?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत ट्वीट करत सवाल उपस्थित केला होता. वाल्मिक कराड ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव ज्योती मंगल जाधव आहे असे काही माध्यमांनी दाखवले. ह्या त्याच ज्योती मंगल जाधव आहेत का ? ह्याच्या नावाचे हे सोलापुरातले हे 4 सातबारे आहेत. ह्या ज्योती मंगल जाधव कोण आहेत? ह्याचा तपास ED ने करावा. कोणी ह्या जमिनीचे पैसे दिले ह्याचा देखील तपास झाला पाहिजे. खूपच मोठी जमीन आहे. जमिनी कोणी घेतल्या, पैसे कोणी व कसे दिले ह्याची देखील चौकशी झाली पाहिजे, असे ट्वीट अंजली दमानिया यांनी केले होते.