निलेश बंगाले,वर्धा:
Wardha News: जिल्ह्यातील वाठोडा शिवारात एका तरुण नर वाघाचा वावर वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रादेशिक वनविभाग पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आला आहे. या वाघाचा मुक्तसंचार सुरू असल्याने परिसरातील तब्बल १० गावांमध्ये वनविभातर्फे खबरदारीचा इशारा (हाय अलर्ट) जारी करण्यात आला आहे. वाठोडा, धामणगाव, आमला, वाघधरा, बेलगाव, झाडगाव, लोणसावळी, शेकापूर, जोगाधरी आणि वायफड या गावांचा या सतर्कतेच्या यादीत समावेश आहे.
Sugar Hike: ऐन सणासुदीत साखर महागली! सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं; दर कशामुळे वाढले?
10 गावांवर संकट, प्रशासन अलर्ट
वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा मुक्तसंचार करणारा वाघ अंदाजे ३ वर्ष वयोगटातील नर असून, त्याच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र परिसरातील जंगल पिंजून काढत आहेत. वाघाच्या प्रत्येक हालचालीवर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे आणि प्रत्यक्ष गस्तीव्दारे बारीक लक्ष ठेवले जात आहे.
या भागात वाघाचा सतत वावर असल्यामुळे वरील १० गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभागाकडून सतत जनजागृती मोहीम राबवली जात आहे. नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय करावे आणि काय करू नये, याबाबतच्या सविस्तर सूचना वनधिकाऱ्यांकडून दिल्या जात आहेत. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी शेतात जाणे टाळावे, तसेच एकटे जाणे टाळून समूहाने वारावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वनविभागाची टीम परिस्थितीवर सतत डोळसपणे नजर ठेवून आहे.
VIDEO: 'आयर्न मॅन'च्या रुपात मराठी अभिनेता! मुंबईमधील रॅलीत फिर फिर फिरला, कोणीच ओळखले नाही
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world