Pandharpur News : पांडुरंगाच्या दरबारी वारकऱ्याला रक्त येईपर्यंत मारहाण; संतापजनक Video

पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाला (Warkari Beaten up) मंदिराच्या सुरक्षा रक्षकाकडून मारहाण झाल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात (Pandharpur News) दाखल झालेल्या एका भाविकाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपुरच्या दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकाला पंढरपूर मंदिर संस्थानच्या सुरक्षा रक्षकाकडून (Devotee beaten up in Pandharpur) मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

नक्की वाचा - Pandharpur News : पांडुरंगाचं दर्शन घेऊन घरी परतत असताना अघटित घडलं, 51 वारकऱ्यांच्या एसटीचा भीषण अपघात

पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाला (Warkari Beaten up) मंदिराच्या सुरक्षा रक्षकाकडून मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे. भाविकाला रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

भाविकाच्या हाताला जखम झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. मारहाण झालेल्या संतप्त भाविकांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.