Maharashtra Dam : गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. यंदा कधी नव्हे ते मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला आहे. परिणामी महाराष्ट्रातील बहुतांश धरणं भरून वाहत आहेत. दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून आज सकाळी 6 वाजेपासून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण पातळी वाढल्याने प्रशासनाने नियोजित पद्धतीने विसर्ग सुरू ठेवला आहे. यामुळे नीरा, भीमा, घोड, मुळा-मुठा आदी नद्यांच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे.
महत्त्वाचे विसर्ग (क्यूसेक्समध्ये):
• खडकवासला – 17,974
• पानशेत – 6,288
• वरसगाव – 5,711
• मुळशी – 5,600
• डिंभे – 7,000
• घोड – 10,000
• भाटघर – 8,276
• वीर – 14,121
• उजनी – सर्वाधिक 61,600
• नीरा देवघर – 3,565
• गुंजवणी – 1,722
प्रवाह क्षेत्रात विसर्ग:
• बंडगार्डन (मुठा नदी) – 19,719
• दौंड – 40,283
• नीरा नरसिंगपूर – 1,08,277
• पंढरपूर (भीमा नदी) – 81,911
आज ३० जुलैपर्यंत धरणातून नदी पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग खालीलप्रमाणे...( सकाळी - 6.00 वाजता)
1. पिंपळगांव जोगे – 0 क्यूसेक्स
2. माणिकडोह – 0 क्यूसेक्स
3. येडगाव – 0 क्यूसेक्स
4. वडज – 500 क्यूसेक्स
5. डिंभे – 7000 क्यूसेक्स
6. घोड – 10000 क्यूसेक्स
7. विसापूर – 24 क्यूसेक्स
8. चिल्हेवाडी – 2000 क्यूसेक्स
9. कळमोडी – 766 क्यूसेक्स
10. चासकमान – 400 क्यूसेक्स
11. भामा आसखेड – 0 क्यूसेक्स
12. वडीवळे – 1123 क्यूसेक्स
13. आंद्रा – 865 क्यूसेक्स
14. पवना – 0 क्यूसेक्स
15. कासारसाई – 414 क्यूसेक्स
16. मुळशी – 5600 क्यूसेक्स
17. टेमघर – 280 क्यूसेक्स
18. वरसगाव - 5711 क्यूसेक्स
19. पानशेत – 6288 क्यूसेक्स
20. खडकवासला – 17974 क्यूसेक्स
21. गुंजवणी – 1722 क्यूसेक्स
22. नीरा देवधर – 3565 क्यूसेक्स
23. भाटघर – 8276 क्यूसेक्स
24. वीर – 14121 क्यूसेक्स
25. नाझरे – 212 क्यूसेक्स
26. उजनी – 61600 क्यूसेक्स
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 89.33 टक्क्यांवर
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 89.33 टक्के झाला आहे. त्यामुळे उद्या धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकासोबत बैठक घेण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने तेथील धरणं भरली आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात आला. हे सर्व पाणी जायकवाडी धरणात आल्याने झपाट्याने पाण्याची पातळी वाढली. सद्याचा पाणीसाठा पाहता जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.