WAVES 2025 परिषद म्हणजे सर्जनशीलता, नवप्रवर्तनाचा खास सोहळा, NDTV चही खास दालन

भारताची सांस्कृतिक आणि मनोरंजनाची राजधानी मुंबईत 1 ते 4 मे 2025 दरम्यान WAVES 2025चं आयोजन करण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

WAVES 2025 : भारताची सांस्कृतिक आणि मनोरंजनाची राजधानी मुंबईत 1 ते 4 मे 2025 दरम्यान WAVES 2025चं आयोजन करण्यात आलं आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांच्या सहकार्याने हा सोहळा मुंबईत आयोजित केला आहे. WAVES 2025 हे भारताला जागतिक कंटेंट हब म्हणून स्थापित करण्याचे एक क्रांतिकारी पाऊल आहे, जिथे सर्जनशीलता, नवप्रवर्तन आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा एकत्र येणार आहे. जगात प्रथमच भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यावेळी  WAVES 2025 महोत्सवात 'NDTV'चं खास दालन असणार आहे. सध्याच्या स्पर्धेच्या जगातही अचूकता आणि पारदर्शी पत्रकारितेसाठी NDTV ही संस्था ओळखली जाते. देशभरातील वृत्त संस्थांमध्ये जिथं राजकारणाच्या बातम्यांना अधिक महत्त्व दिलं जातं असताना NDTV मात्र लोकाभिमूख विषय, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिला आहे. गेल्या कित्येक वर्षांच्या प्रमाणिक पत्रकारितेमुळे NDTV लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 

Advertisement

नक्की वाचा - WAVES 2025 परिषदेचा मुंबईत भव्य सोहळा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

'कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज' या ब्रीदवाक्यासह, WAVES 2025 ही भारतातील पहिली जागतिक मीडिया आणि मनोरंजन परिषद आहे. जी मुंबईच्या बांद्रा कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजनासाठी  सज्ज  झाली आहे. हा चार दिवसांचा महोत्सव भारताच्या 54 अब्ज अमेरिकी डॉलरच्या (2026 पर्यंत) मीडिया आणि मनोरंजन बाजारपेठेला नव्या उंचीवर नेण्यासाठी आकारला गेला आहे. या परिषदेत भारताच्या कथाकथन परंपरेला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अॅनिमेशन, VFX, गेमिंग, AR/VR/XR, कॉमिक्स, चित्रपट, माहितीपट, सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म आणि प्रसारण यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांशी जोडले जातील. ही परिषद केवळ एक इव्हेंट नाही, तर सर्जनशीलतेचा महासागर आणि नवप्रवर्तनाची लाट आहे, जी भारताला जागतिक सर्जनशील केंद्र बनवण्यासाठी सज्ज झाले आहे. 


परिषदेला बड्या जागतिक नेत्यांची उपस्थिती

WAVES 2025 मध्ये 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी, 40 जागतिक मंत्री आणि नेटफ्लिक्स, गुगल, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, सोनी पिक्चर्स, अॅडोब, एपिक गेम्स यासारख्या दिग्गज कंपन्या सहभागी होतील. जागतिक बॉलिवूडचे वरिष्ठ  कलाकार शाहरुख खान, रजनीकांत, अक्षय कुमार, चिरंजीवी, आमिर खान, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर आणि दिलजीत दोसांज यांच्या सल्लागार मंडळाने या परिषदेला पाठिंबा दिला आहे. नेटफ्लिक्सचे टेड सरांडोस, अॅमेझॉनचे माइक हॉपकिन्स आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गजांची उपस्थिती WAVES परिषदेला जागतिक स्तरावर ओळख देईल. या परिषदेचा मुख्य उद्देश भारताच्या मीडिया आणि मनोरंजन उद्योगाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे, आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे आणि नवप्रवर्तनाला गती देणे आहे. भारत आणि इतर देशांमधील सर्जनशील उद्योगांमधील भागीदारी वाढवणे, AI आणि गेमिंगसारख्या तंत्रज्ञानांचा वापर करून उद्योगाला नवे आयाम देणे आणि 2027 पर्यंत 36.1 अब्ज डॉलरची सर्जनशील अर्थव्यवस्था उभारणे हा या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. यामुळे 2–3 लाख रोजगार निर्माणही होतील, सोबतच महिला-नेतृत्वातील स्टार्टअप्स आणि 12–19 वयोगटातील क्रिएटर्सना प्राधान्य देऊन त्यांचा  समावेशकता वाढेल.

Advertisement