अमोल गावंडे, प्रतिनिधी
'माझ्या तीन पिढ्यांनी शेतीच्या विजेचं बिल भरलेलं नाही. डीपी जळाली तर इंजिनिअरला पैसे देऊन नवीन बसवतो, अशी जाहीर कबुली केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिवसेना खासदार संजय
मी शेतकरी आहे. तीन पिढ्यांपासून बील भरलेलं नाही. आजोबांनी भरलं नाही, वडिलांनी भरलं नाही आणि आम्ही भरत नाही. विजेचा डीपी जळाला तर इंजिनिअरला हजार-दोन हजार रुपये देतो, आणि डिपी आणून बसवतो.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आज या सरकारनं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं वीज बिल माफ करण्याची हिंमत केली. तुम्हाला पूर्वी लोडशेडिंगमुळे रात्री शेतात जावं लागायचं. आता तुम्हाला दिवसा वीज मिळणार आहे. सौर ऊर्जेचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहेत.
कोण आहेत प्रतापराव जाधव?
शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी मेहकरचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. ते मेहकर तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती झाले. पुढे जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकलेही. मेहकरचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केले. जिल्हा बँकेचे संचालक, उपाध्यक्ष अशी पदे त्यांना मिळत गेली. 1995 साली ते पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. त्यानंतर सलग तिन वेळा ते विधानसभेचे आमदार होते. 1995 ते 2009 या काळात ते आमदार होते. युती काळात 1997 ते 1999 या काळात त्यांनी क्रीडा राज्यमंत्री म्हणूनही काम केले. पुढे 2009 ला जाधव यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दिल्ली गाठली.
2009 साली प्रतापराव जाधव यांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. बुलढाण्यात त्यांची लढत त्यावेळचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या बरोबर झाली. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांचा 28 हजार मतांनी पराभव केला होता. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दिली गाठली.
( नक्की वाचा : पितृपक्ष सुरू पण कावळे कुठं आहेत? राज्यातील धक्कादायक परिस्थितीचा Ground Report )
2014 साली देशभरात मोदी लाट असल्यामुळे प्रतापराव जाधव यांचा पुन्हा एकदा मार्ग मोकळा झाला होता. तर 2019 मध्ये त्यांच्यासमोर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे उभे होते. यावेळी ही त्यांनी शिंगणेंना आस्मान दाखवत हॅटट्रिक केली. पुढे शिवसेनेत फुट पडली. त्यावेळी जाधव यांनी ठाकरे ऐवजी शिंदेंना साथ दिली. शिंदेंच्या शिवसेनेने त्यांना बुलढाण्यातून उमेदवारी दिली. ते अटीतटीच्या लढतीत विजयी झाले.