Ichalkaranji News : गणेश विसर्जन मिरवणुकीत गेला अन् दृष्टीच गेली; इचलकरंजीतील धक्कादायक प्रकार

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ichalkaranji News : गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा विविध कारणांनी चर्चेत राहिली. लालबागच्या राजाचं उशीरा झालेलं विसर्जन शिवाय पुण्यात उशिरापर्यंत सुरू असलेल्या मिरवणूक यामुळे यंदाचं गणेश विसर्जन अनेकार्थाने चर्चेत राहिलं. गणेश विसर्जनाला एक आठवडा उलटून गेला आहे. दरम्यान एक धक्कादायक प्रकार इचलकरंजीतून समोर आला आहे.

इचलकरंजीत गणेश विसर्जन मिरवणुकीतील लेसर किरणांमुळे एका व्यक्तीच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्याच समोर आलं आहे. गांधी पुतळा परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीत हा प्रकार घडला आहे. मिरवणुकीत डीजेसह लेझर लाइनचा अमाप वापर केला जातो. याचा परिणाम इचलकरंजीतील एका व्यक्तीवर झाला आहे. सध्या या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. नुकताच हा प्रकार उजेडात आला आहे. एका जुन्या नावाजलेल्या टेलर व्यावसायिकाच्या डोळ्याला लेसर किरणांमुळे इजा झाल्याची चर्चा शहरात आहे. डोळ्यांनाच इजा झाल्यामुळे त्यांंचं काम थांबलं आहे. लेझरच्या वापरावर बंदी घातलेली असताना केवळ आकर्षणासाठी मिरवणुकीत बेकायदा लेझर वापरल्याने त्याचा परिणाम सामान्यांना भोगावा लागत आहे.

नक्की वाचा - Maharashtra Rain : आजही कोसळधार! राज्यात आज कसा असेल पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

मिरवणुकीत लावलेल्या लेझर लाईटमुळे टेलर व्यावसायिकाच्या डोळ्याला धुसर दिसू लागलं आहे. रात्रभर उपचार उपलब्ध न झाल्याने दुसऱ्या दिवशी त्यांच्या डोळ्याची पूर्णपणे दृष्टी गेली. त्यानंतर वैद्यकीय उपचार सुरू झाले. पाचहून अधिक तज्ज्ञांना दाखवून तब्बल 50 हजारांहून अधिक रुपये खर्च करावा लागला. सध्या बंगळुरुतील तज्ज्ञांकडून त्याच्यावर उपचार सुरू असून, पुन्हा दृष्टी येण्यासाठी सहा महिने लागतील असा डॉक्टरांनी अंदाज वर्तवला आहे.

Advertisement