वेळापत्रक पाहून करा प्रवास! पश्चिम रेल्वेवर शनिवारी तर मध्य-हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक

Mumbai Local Mega Block News: मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर रविवारी तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक...

Advertisement
Read Time: 2 mins

Mumbai Local Mega Block News: शनिवार आणि रविवार फिरण्याची, नातेवाईकांना भेटण्याची योजना आखत असाल तर सर्वप्रथम रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. कारण पश्चिम रेल्वेवर शनिवारी (15 जून) तर मध्य रेल्वेवर रविवारी (16 जून) मेगा ब्लॉक असणार आहे. 

कोणत्या कामांसाठी घेण्यात आलाय मेगा ब्लॉक? 

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल तसेच दुरुस्तीच्या कामानिमित्त ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असेल.
कधी : रविवारी सकाळी 11 वाजून 05 मिनिटांपासून ते  दुपारी 3 वाजून 05  मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक असेल. 
परिणाम : ब्लॉक कालावधीदरम्यान माटुंगा –मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

(ट्रेडिंग न्यूज: आषाढ वारीत सहभागी दिंड्याना 20 हजार रुपयांचे अनुदान, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा)

हार्बर रेल्वे 

कुठे : कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : रविवारी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते दुपारी  4 वाजून 10 मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक असेल. 
परिणाम : ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी अप व डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशीस्थानकादरम्यान विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी व नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

Advertisement

(ट्रेडिंग न्यूज: Rain Alert : राज्यभर शनिवारी पावसाचा जोर कसा असेल? या जिल्ह्यांना यलो अलर्ट)

पश्चिम रेल्वे

कुठे : वसई रोड – भाईंदर स्थानकादरम्यान अप आणि धीम्या जलद मार्गावर
कधी : शनिवारी मध्यरात्री 11.30 वाजेपासून ते पहाटे 4.45 वाजेपर्यंत

परिणाम : पश्चिम रेल्वेवरील सर्व जलद लोकल विरार ते भाईंदर स्थानकांदरम्यान/ बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल.

Advertisement

(ट्रेडिंग न्यूज: UGC NET Admit Card 2024 कार्ड कधी मिळणार? परीक्षेची संधी हातची जाण्याची विद्यार्थ्यांना भीती)

Dry Fish Price Hike | सुक्या मासळीचे भाव भिडले गगनाला; सुका जवळा, बोंबील, करदी महागली 

Topics mentioned in this article