Local News: लोकलसेवा कोलमडली! मुंबईकरांचे प्रचंड हाल, रुळावरुन चालत घरी जाण्याची वेळ, नेमकं काय घडलं?

ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत असून रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर:

Mumbai Western Railway Local Train News:  रविवारी मेगाब्लॉकने मुंबईकरांच्या प्रवासाचा खोळंबा झालेला असतानाच आणखी एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे.  वसई आणि नायगावच्या मध्ये ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची अप मार्गांवरील वाहतूक वीस ते पंचवीस मिनिटे उशिरा धावत असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत! 

समोर आलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवेला आज तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला आहे. भायंदर आणि विरार स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर (ओएचई) तुटल्याची घटना घडल्याने जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत असून रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Advertisement

Pune Crime: भररस्त्यात भयंकर दृश्य! नागरिक थांबले, घटनास्थळ पाहून पोलिसही हादरले, पुण्यात काय घडलं?

प्रवाशांना नाहक त्रास

​मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे जलद मार्गावरील विद्युत पुरवठा खंडित झाला. परिणामी, सर्व जलद गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. यामुळे धीम्या मार्गावर गाड्यांची मोठी रांग लागली असून लोकल १० ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. भायंदर, वसई आणि विरार यांसारख्या मोठ्या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे.

​रेल्वे प्रशासनाने तांत्रिक चमूला तातडीने घटनास्थळी रवाना केले असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, हा बिघाड दुरुस्त होण्यास आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, रखडलेल्या गाड्यांमुळे वैतागलेले प्रवासी रेल्वे रुळावर उतरून पायी प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनासमोर प्रवाशांच्या सुरक्षेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Pune News: पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला मारहाण, Video होतोय Viral