जाहिरात

Sindoor Tree: PM मोदींनी लावलेलं सिंदूर झाड नेमकं कसे असते? महाराष्ट्रातील 'या' गावात आहे भलामोठा वृक्ष

Sindoor Tree Nashik: विशेष म्हणजे परिसरात पाहणी केल्यावर बाजूलाच असलेल्या नदीच्या परिसरात देखील आणखी दोन सिंदूर चे झाड त्यांना पाहायला मिळाले. 

Sindoor Tree: PM मोदींनी लावलेलं सिंदूर झाड नेमकं कसे असते? महाराष्ट्रातील 'या' गावात आहे भलामोठा वृक्ष

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्या निवासस्थानी सिंदूरचे रोप लावले. पंतप्रधानांनी सोशल मीडियावर रोप लावतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की सिंदूरच झाड कसं असतो त्याला फळ कशी लागतात. दरम्यान याच प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. ज्यात आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील बहुली गावात पोहचलो. या गावात 50 वर्ष जूनं सिंदूरच झाड आहे. तसं हा झाड दुर्मिळ असल्याने लवकर लक्षात येत नाही. पण दोन वर्षांपूर्वी पर्यावरण अभ्यासक संतोष पाटील यांनी हे झाड शोधून काढले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सिल्लोड तालुक्यातील पर्यावरण अभ्यासक संतोष पाटील हे सतत ग्रामीण भागात मोहिमेवर असतात. दरम्यान 2023 मध्ये सिल्लोड तालुक्यातील बहुली गावात ते भटकंती करत होते. याचवेळी त्यांना एका शेताच्या बांधावर आगळवेगळं झाड दिसलं. त्यांना संशय होता हा झाड सिंदूरचा असावा, त्यामुळे त्यांनी खात्री केली आणि ते झाड सिंदूरचं असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे परिसरात पाहणी केल्यावर बाजूलाच असलेल्या नदीच्या परिसरात देखील आणखी दोन सिंदूर चे झाड त्यांना पाहायला मिळाले. 

Baramati Crime: जीमसमोर उभी क्रेटा कार, पोलिसांना संशय आला अन्.. बारामतीत सर्वात मोठी कारवाई

सिंदूरचं झाड नेमकं कसं असतं? 

सिंदूर हे वनस्पती मूळचे दक्षिण अमेरिकेतील आहे.

भारताचा विचार केल्यास महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशातील काही निवडक भागात सिंदूरचे झाड पाहायला मिळतात.

या झाडाची उंची २० ते २५ फूट उंच असते.

सिंदूर झाडाचं वय पाहिल्यास 50ते 75 वर्षे एवढे असतं.

झाडाला अलेल्या फळापासून सिंदूर बनवले जाते. 

सिंदूरच्या झाडाला लागणारे फळ वनस्पती असल्याने माकडं चवीने त्याला खातात.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com