What is Ladki Sunbai Yojana 'लाडकी बहीण' नंतर 'लाडकी सूनबाई! काय आहे नवी योजना? जाणून घ्या सविस्तर

ladki Sunbai Yojana: लाडकी सून या योजनेचा राज्य संबंधित पद ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना यावेळी देखील देण्यात आलेली माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Shivsena Ladki Soon Yojana:  राज्य सरकारची महत्त्वांकाशी मानली जाणारी लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी ठरली.  राज्यभरातील महिला वर्गाचा याला अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळाला. याच योजनेने महायुतीला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिले. लाडकी बहीणच्या या यशानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून लाडकी सूनबाई योजनेची घोषणा केली आहे. काय आहे ही योजना? जाणून घ्या..

C.P. Radhakrishnan: उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळालेले सी.पी. राधाकृष्णन कोण? काय आहे राजकीय पार्श्वभूमी?

काय आहे 'लाडकी सून' योजना? (What Is Ladki Sunbai Scheme)

राज्य सरकारच्या वतीने लाडके बहीण योजना राबवल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून लाडकी सूनबाई योजना  घरोघरी पोहोचणार आहे. रविवारी याचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे लाडकी सून या योजनेसाठी प्रत्येक शिवसेने शाखेमध्ये किंवा जे काही शिवसेनेचे विभागीय कार्यालय असेल या ठिकाणावरून त्यांना मदत केली जाणार आहे, तसेच एक हेल्पलाइन नंबर दिलेला आहे. 

या हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून लाडक्या सुनेवर जर कोणी अन्याय किंवा अत्याचार करत असेल तर त्यांनी शिवसेनेच्या या हेल्पलाइन नंबरशी संपर्क साधला तर त्यांना मदत केली जाणार आहे.  राज्यस्तरावर ही मोहीम राबवली जाणार आहे, त्यामुळे भविष्यामध्ये ज्या काही लाडक्या सून आहेत त्यांना देखील याचा बाबतीत फायदा होणार आहे. तसेच ज्या लाडके सासू आपल्या सुनांचा चांगला सांभाळ करत आहेत त्याकडे देखील शिवसेनेचे लक्ष दिले जाणार आहे. लाडकी सून या योजनेचा राज्य संबंधित पद ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना यावेळी देखील देण्यात आलेली माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Ajit Pawar: 'ते' वक्तव्य करून अजित पवार मला सतत टॉर्चर करतायत', राम शिंदे थेटच बोलले