जाहिरात

C.P. Radhakrishnan: उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळालेले सी.पी. राधाकृष्णन कोण? काय आहे राजकीय पार्श्वभूमी?

सी.पी. राधाकृष्णन यांचे संपूर्ण नाव चंद्रपुरम पोन्नूस्वामी राधाकृष्णन असं आहे.

C.P. Radhakrishnan: उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळालेले सी.पी. राधाकृष्णन कोण? काय आहे राजकीय पार्श्वभूमी?
मुंबई:

सी. पी. राधाकृष्णन यांना NDA ने उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. NDA चे राज्यसभा आणि लोकसभेतील संख्याबळ पहाता सी. पी. राधाकृष्णन यांचे उपराष्ट्रपती होणे हे जवळपास निश्चित मानले जात आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर सी.पी. राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. सी.पी. राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांना देशभरातून एनडीएचे नेते शुभेच्छा देत आहेत.  सी.पी. राधाकृष्णन यांचे संपूर्ण नाव चंद्रपुरम पोन्नूस्वामी राधाकृष्णन असं आहे. त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूतील तिरुप्पूर येथे झाला. ते भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत. सध्या राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यांनी आरएसएस आणि जनसंघापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली होती. शिवाय ते खासदारही राहीले आहेत. 

नक्की वाचा - Live Update: सी.पी. राधाकृष्णन यांची NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा

राजकीय प्रवास

  • * राज्यपाल पद
  • * महाराष्ट्र: 31 जुलै 2024 पासून राज्यपाल.
  • * झारखंड: 18 फेब्रुवारी 2023 ते 30 जुलै 2024 पर्यंत राज्यपाल.
  • * तेलंगणा: मार्च ते जुलै 2024 पर्यंत अतिरिक्त कार्यभार.
  • * पुडुचेरी: मार्च ते ऑगस्ट 2024 पर्यंत उपराज्यपाल (अतिरिक्त कार्यभार).

खासदार

  • * 1998 आणि 1999 मध्ये कोइम्बतूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.
  • * भाजप संघटनेत भूमिका
  • * 2003 ते 2006 पर्यंत तामिळनाडू भाजप अध्यक्ष.
  • * आरएसएस आणि जनसंघातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात.

उल्लेखनीय उपक्रम

  • * 2004-2007 दरम्यान, भाजप तामिळनाडू अध्यक्ष म्हणून, त्यांनी 93 दिवसांच्या रथयात्रेचे नेतृत्व केले. त्याचा उद्देश होता
  • * नद्यांना जोडणे
  • * दहशतवाद विरोधी
  • * अस्पृश्यता निर्मूलन

अन्य जबाबदाऱ्या 

  • * संसदेत वस्त्रोद्योगावरील स्थायी समितीचे अध्यक्ष होते.
  • * अनेक आर्थिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांशी संबंधित समित्यांवर काम केले.

शैक्षणिक पार्श्वभूमी

  • * कोइम्बतूर येथील व्ही.ओ. चिदंबरम कॉलेजमधून बी.बी.ए. (व्यवसाय प्रशासन पदवी).

Listen to the latest songs, only on JioSaavn.com