Lakhpati Didi Scheme : महिलांचं भाग्य बदलणारी 'लखपती दीदी' योजना काय आहे? कसा करणार अर्ज?

Lakhpati Didi Yojana : 'लाडकी बहीण' योजनेप्रमाणेच 'लखपती दीदी' योजनेबाबतही राज्यात सध्या चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच या योजनेबाबतचा कार्यक्रम जळगावमध्ये झाला.

Advertisement
Read Time: 2 mins
L
मुंबई:

Lakhpati Didi Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सध्या राज्यात चांगलीच चर्चा आहे. राज्य सरकारनं सुरु केलेल्या या महत्त्वकांक्षी योजनेनुसार लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिना दीड हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्यापूर्वी जमा झाला आहे. त्यामध्ये दोन महिन्यांचे एकत्र 3 हजार रुपये मिळाले आहेत. दुसरा हप्ताही लवकरच जमा केला जाईल, असं सरकारनं स्पष्ट केलंय. 'लाडकी बहीण' योजनेप्रमाणेच 'लखपती दीदी' योजनेबाबतही राज्यात सध्या चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच या योजनेबाबतचा कार्यक्रम जळगावमध्ये झाला.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कधी झाली सुरुवात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून भाषण करताना 'लखपती दीदी' योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. आर्थिक दृष्ट्या वंचित असलेली महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकारनं ही योजना सुरु केली आहे. 

काय आहे पात्रता?

लखपती दीदी योजनेसाठी पात्रतेच्या अटी प्रत्येक राज्यांमंध्ये काही प्रमाणात वेगळ्या आहेत. पात्रतेचे सामान्य निकष खालीलप्रमाणे

  •  या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करु शकतात
  •  लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवाशी असावी.
  •  त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न 3,00,000 (तीन लाखांपेक्षा) कमी असणे आवश्यक.
  •  महिलेचे वय 18 ते 50 दरम्यान असावे
  •  या योजनेसाठी अर्ज करणारी महिला बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे. 

( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे )
 

कोणती कागदपत्र लागणार?

लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडं आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, पासबूक, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे. 

महिला कशा होणार लखपती?

लखपती दीदी योजनेनुसार महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य शिकवले जाणार आहेत. या ट्रेनिंगच्या दरम्यान महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठीही टिप्स दिले जातील. त्याचबरोबर आर्थिक विषयांची माहिती देण्यासाठी वर्कशॉप्स, बिझनेस प्लॅन, मार्केटिंग, बजेट, सेव्हिंग आणि गुंतवणुकीची माहिती दिली जाते. त्याचबरोबर व्यवसासाठी तंत्रज्ञानाच्या वापरासह डिजिटल बँकिंग सर्विस, मोबाईल वॉलेट आणि फोन बँकिंगबद्दल देखील महिलांना प्रशिक्षण दिले जाते. 

Advertisement

( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'ना मिळणार पूर्ण पैसे, राज्य सरकारची बँकाना मोठी सूचना )
 

अर्ज कसा करणार?

लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना 'स्वयं मदत गट' व्यवसाय योजना तयार करावी लागेल. व्यवसायाचा आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडं पाठवण्यात येईल. या अर्जाची छाननी आणि पुनरावलोकन केलं जाईल. सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र होतील. 

एकूण 3 कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याची केंद्र सरकारची योजना आहे.