Pune Crime: सट्टेबाजी, खंडणी अन् तुरुंगवास.., अश्लील कृत्य करणारा पुण्यातील तरुण कोण? A टू Z माहिती समोर

Pune News: येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकामध्ये मद्यधुंद तरुणाने गाडीतून उतरून महिलांसमोर अश्लील चाळे केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे: पुण्यामध्ये एका मद्यधुंद बीएमडब्लू चालकाने भररस्त्यात अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकामध्ये मद्यधुंद तरुणाने गाडीतून उतरून महिलांसमोर अश्लील चाळे केले. सकाळच्या सुमारास शास्त्री चौकात निळ्या रंगाच्या बीएमडब्लू गाडीतून उतरुन या तरुणाने भररस्त्यात लघुशंका केली, या भयंकर घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त हिंमत पाटील यांनी सांगिले की, आज सकाळी 7:30 शास्त्रीनगर मध्ये जी घटना घडली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकर आरोपीला ताब्यात घेणार आहोत. गरज लागली कुटूंबातील लोकांना चौकशीला बोलवणार असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी पुणे येरवडा प्रकरणात भाग्येश निबजिया (गाडीत शेजारी बसलेला ) गौरव आहुजा (चालक ) या दोन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विकृत कृत्य करणारा गौरव अहुजा हा मनोज आहुजा यांचा मुलगा आहे, याप्रकरणी पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे. याबाबत त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते. त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तप ती माझ्या तोंडावर केली. त्याचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी कारवाई होईल ती मला मान्य आहे, असे मनोज आहुजा यांनी म्हटले आहे. 

(नक्की वाचा- कशाला एवढं ताणता, जीवावर उठता का? तो फोन... आपल्यासोबत बरंवाईट होणार हे देशमुखांना कळलं होतं?)

दरम्यान, याप्रकरणातील मुलगा गौरव आहुजा आणि मनोज आहुजा यांच्याबाबत आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मोठा दावा केला आहे. गौरव आहुजा हा पहिल्यांदाच गुन्हेगार नाही, तो एक सवयीचा गुन्हेगार आहे ज्याला गुन्ह्यांचा दीर्घ इतिहास आहे. त्याला कायदा माहित आहे, कायदेशीर पळवाटा कशा वापरायच्या आणि अटक कशी टाळायची हे माहित आहे. त्याचा मागील रेकॉर्ड घाणेरडा आहे, असे कुंभार यांनी म्हटले आहे.

तसेच गौरव आहुजा आणि त्याचे वडील मनोज आहुजा दोघांवरही क्रिकेट सट्टेबाजी, खंडणी आणि तुरुंगवास अशा अनेक गुन्हेगारी खटले दाखल आहेत. मनोरंजक म्हणजे, गौरवच्या आधीच्या अटकेदरम्यान एका पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा देखील यात सामील असल्याचे आढळून आले. तर, त्यांचा धाडस कुठून येतो? पुण्यात त्यांचा शक्तिशाली राजकीय संरक्षक कोण आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement

Pune News: श्रीमंतीचा माज, भरचौकात नंगानाच... BMW मधून उतरला अन्.. पुण्यातील घटनेने संताप