राज्यात सध्या विविध विधानसभा मतदार संघातील आमदार त्यांच्या वेगवेगळ्या शैलीमुळे लक्ष वेधून घेतात. असंच एक व्यक्तिमत्त्व सध्या त्यांच्या डोक्यावरच्या पगडीमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत ते म्हणजे (MLA Atul Benke) अतुल बेनके....
जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इथले उमेदवार आहेत. त्यांचे वडील वल्लभ बेनके हे देखील या जुन्नर मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले आणि त्यानंतर अतुल बेनके यांनी ही पगडी घालण्यास सुरुवात केली.
नक्की वाचा - हृदयद्रावक! कार- ट्रकचा भयंकर अपघात, चौघांचा जागीच अंत; लातूर जिल्ह्यातील घटना
आता त्यांनी ही पगडी त्यांच्या वर्ष श्राद्धाला विधीवत काढणार असल्याचं सांगितलं आहे. खरंतर ही पगडी का घातली असावी? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नकळत येऊन जातो... मात्र यामागचे कारण म्हणजे अतुल बेनके यांनी त्यांचे पिताश्री वल्लभ बेनके यांना मनोमन दिलेल वचन... वल्लभ बेनके यांनी जुन्नर तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना जनसेवेचा वसा घेतला होता असे त्यांचे म्हणणे आहे आणि त्यांचा हा वसा मी पुढे चालू ठेवणार आहे. त्याकरिता जुन्नर तालुक्यामध्ये जनसामान्यांच्या समस्या समजावून घेणे विशेषत आदिवासी भागातील बांधवांसाठी मदतीचा हात देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासोबतच समाजातील सलोखा राखणे हे देखील एक उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांना पुढे जायचे आहे.
दरम्यानच्या काळात महायुतीने लाडकी बहीण योजना आणली या योजनेदरम्यान त्यांनी तालुक्यातील तळागाळातील महिलांशी विविध माध्यमांद्वारे संपर्क साधून ही योजना प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला.अशा एक ना अनेक योजना या तालुक्यांमध्ये राबवून त्यांचे वडील दिवंगत वल्लभ बेनके यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या डोक्यावर ही पगडी ठेवली आणि केस हे देखील वाढविले आहेत. ता वर्ष श्राद्धाच्या वेळेस ही केशोवपन करून ते विधिवत पगडी उतरवतील असं माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितल आहे.खरं तर या पगडीत देखील त्यांचे व्यक्तिमत्व हे खुलून दिसत आहे आणि त्यामुळे ते जिथे जातील त्या ठिकाणी ते लक्ष वेधून घेत आहेत. एवढेच नाही तर आज राज्यभरात ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होताना दिसत आहे. एकूणच काय तर राज्यात वेगवेगळ्या आमदारांच्या वेशभूषेमुळे ते जनसामान्यांच्या लक्षात राहतात. सध्या जुन्नर तालुक्यातील हे आमदार अतुल बेनके त्यांच्या या पांढऱ्याशुभ्र पगडीमुळे सर्वांच्या नजरेत भरताहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.