महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर का केल्या नाही ? निवडणूक आयोगाने सांगितले कारण

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये दोन राज्यांतील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

Advertisement
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

रामराजे शिंदे

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दोन राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. हरयाणा आणि जम्मू कश्मीरच्या निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या, या दोन राज्यांसोबत महाराष्ट्रातील निवडणुकांच्याही तारखा जाहीर होऊ शकतात असा काहींचा तर्क होता. मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या नाहीत. यामागची कारणे काय असावीत असा अनेकांना प्रश्न पडू शकतो. निवडणूक आयुक्तांना देखील हा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये दोन राज्यांतील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. जम्मू कश्मीर आणि हरयामामध्ये निवडणुका होणार आहेत. जम्मू कश्मीरमधील निवडणुका या बहुप्रतिक्षित होत्या ज्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेचे जम्मू कश्मीरकरांचे विशेष लक्ष लागलेले होते. जम्मू कश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार असून हरयाणामध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील. दोन्ही राज्यांचे निकाल एकाच दिवशी जाहीर करण्यात येणार आहेत. 

जम्मू कश्मीर आणि हरयाणातील निवडणुका कधी होणार?

  1. जम्मू कश्मीरमध्ये दीर्घकाळानंतर निवडणुका होणार आहेत. इथे 18ऑक्टोबर, 25 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. जम्मू कश्मीरमध्ये मतमोजणी 4 ऑक्टोबरला होणार आहे. 
  2. हरयाणामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. इथे एकाच टप्प्यात मतदान होणार असून इथली मतमोजणी 4 ऑक्टोबरला होणार आहे. 
  3. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. जम्मू कश्मीरमध्ये निवडणुकांची मोठी उत्सुकता असल्याचे त्यांनी सांगितले. हिंसाचाराला इथली जनतेने नाकारले असून त्यांना लोकनियुक्त सरकार केव्हा स्थापन होतेय याची उत्कंठा असल्याचे ते म्हणाले. 
  4. जम्मू कश्मीरमध्ये 87 लाख 9 हजार मतदान आहेत. यातील 3.79 लाख मतदार हे पहिल्यांदाच मतदान करणारे आहेत. जम्मू कश्मीरमध्ये निवडणुकीबद्दल मोठी उत्सुकता आहे. इथल्या निवडणुका एखाद्या उत्सवाप्रमाणे असाव्यात हा आमता प्रयत्न असल्याचे राजीव कुमार यांनी म्हटले. 
  5. लोकसभा निवडणुकीत जम्मू कश्मीरमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले होते. तोच उत्साह विधानसभा निवडणुकीसाठी देखील दिसेल अशी आसा निवडणूक आयोगाला वाटते आहे. जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 360 आदर्श निवडणूक केंद्रे उभारण्यात येणार आहेत.   20 ऑगस्ट रोजी मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.  
  6. हरयाणाबाबत बोलायचे झाल्यास इथे 90 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. हरयाणात 2.01 कोटी मतदार आहेत. यातील 95 लाख महिला मतदार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की सगळ्या मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. 
  7. हरयाणामध्ये एकूण 22 जिल्हे असून त्यातील 90 जागांपैकी 73 जागा या सर्वसाधारण कोट्यातील आहेत. 17 जागा अनुसुचित जातींसाठी राखीव आहेत. हरयाणात 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या ही 2.55 लाख इतकी आहे.  
  8. हरयाणामध्ये दिव्यांग मतदारांची संख्या 1.5 लाख इतकी आहे. तृतीयपंथीय मतदारांची संख्या ही 459 इतकी आहे.  हरयाणात 10,459 जागी एकूण 20,629 मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. यातील शहरी भागात 7,132 मतदान केंद्रे असतील तर  ग्रामीण भागात 13,497 मतदान केंद्रे असणार आहेत.  
  9. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 977 मतदार मतदानाचा हक्क बजावतील अशी शक्यता आहे.  हरयाणात आदर्श मतदान केंद्रांची संख्या 150 असून वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मत नोंदवले जाईल असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.  

महाराष्ट्राच्या निवडणुकांची तारीख जाहीर का झाली नाही?

केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, 'अगोदर महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूका सोबत होत होत्या.मात्र तेव्हा जम्मू काश्मीर विधानसभा नव्हत्या. आम्ही यावेळेस हरयाणा आणि जम्मू कश्मीरच्या विधानसभा निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरसाठी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करावी लागणार आहे. महाराष्ट्रात आता पाऊस पडला आहे. गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री आणि दिवाळी असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. मात्र  विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच महाराष्ट्रात निवडणुका होतील.