Chhagan Bhujbal: छगन भुजबळांचे मंत्रिमंडळात कमबॅक! महायुतीने काय साधलं? वाचा 5 मोठे मुद्दे

Chhagan Bhujbal Oath Caremony Maharashtra Politics: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने भुजबळांची मंत्रिमंडळातील एन्ट्री महत्त्वाची मानली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhagan Bhujbal Oath Ceremony: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचा भार त्यांच्याकडे दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश नसल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या. स्वतः छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी दर्शवत थेट अजित पवार यांच्यावरच निशाणा साधला होता. त्यानंतर आता सहा महिन्यांनी छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागली असून त्यांच्या नाराजीनाट्यावर पडदा पडला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने भुजबळांची मंत्रिमंडळातील एन्ट्री महत्त्वाची मानली जात आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

छगन भुजबळ राजकीय पुनर्वसन का महत्त्वाचे? 

1. राज्यातील ओबीसी चेहरा:  छगन भुजबळ हे राज्यातील सर्वात मोठे आणि महत्वाचे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर नाराज झाला होता, ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला.

2. आगामी निवडणुका:  आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनेही छगन भुजबळांची मंत्रिमंडळातील एन्ट्री महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे ओबीसी मतदारांची पुन्हा एकदा महायुतीला साथ मिळणार आहे.

Advertisement

3. राष्ट्रवादीसह अजित पवारांची डोकेदुखी: छगन भुजबळांच्या नाराजीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीही डोकेदुखी ठरली होती. छगन भुजबळ यांनी थेट अजित पवार यांना टार्गेट केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे ही नाराजी पक्षासाठी परडवणारी नव्हती. तसेच   आगामी काळात भुजबळ यांना राज्यसभा देण्यापेक्षा कॅबिनेट पदावर पुनर्वसन सोईस्कर होईल, अशीही यामागे रणनिती आहे. 

4.  नाराज ओबीसी: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ओबीसी मतदारांमध्ये नाराजी होती. ती नाराजी दूर करणे महत्त्वाचे होते. त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र तसंच मराठवाडा ओबीसी मतदारांचा फायदा करुन घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. 

Advertisement

5. CM फडणवीसांचे खास: महत्वाचं म्हणजे, छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात असावेत अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा होती. देवेंद्र फडणवीस स्वतः रिक्त झालेल्या मंत्रिपदावर छगन भुजबळ यांची वर्णी लागावी यासाठी आग्रही होते. तसेच छगन  भुजबळ यांनी फडणवीस यांच्या माध्यमातून अजित पवारांकडे मंत्रिपदासाठी आग्रह धरला होता., असेही सांगण्यात येत आहे.