
संकेत कुलकर्णी, पंढरपूर:
Sambhaji Brigade Pravin Gaikwad News: संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाहीफेक करत हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा निषेध केला जात असून मराठा संघटनाही आक्रमक झाले आहेत. संभाजी ब्रिगेड या नावामध्ये छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख आहे, असा आरोप करत शिवधर्म फाउंडेशनचा अध्यक्ष आणि भाजप कार्यकर्ता दिलीप काटे याच्यासह साथीदारांनी प्रविण गायकवाड यांच्यावर शाईफेक केली. या हल्ल्यानंतर आता प्रविण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी संभाजी ब्रिगेडचे नाव बदलण्यात कायदेशीर अडचणी असल्याचे स्पष्ट केले आहे.
Who is Deepak Kate: प्रविण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणार दीपक काटे कोण आहे?
काय म्हणालेत प्रविण गायकवाड?
"संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) या नावाबाबत आक्षेप असेल तर सरकारचा आक्षेप असू शकतो. धर्मादाय आयुक्ताने परवानगी दिली नाही पाहिजे. असे जरी असले तरी संभाजी ब्रिगेड नावाबद्दलची मागणी आम्ही मान्य करू शकतो. मात्र मुंबईतील सचिन कांबळे युवकांनी छत्रपती संभाजी ब्रिगेड या नावाने संस्था कार्यरत केली आहे. त्यामुळे यामधून मार्ग काढण्यासाठी ती संस्था एकतर बंद केली पाहिजे किंवा मुंबईतील संस्था आम्हाला दिली पाहिजे, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. धर्मादाय आयुक्त कार्यालया अंतर्गत काही कायदेशीर बाबी आहेत. त्यानंतरच संभाजी ब्रिगेड नावाबाबत निर्णय घेता येतो, असं प्रविण गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
"अक्कलकोटमध्ये माझ्यावर झालेला हल्ला हा निषेधार्थ आहे. इथले जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते नसते तर माझे काय झाले असते? सांगता येत नाही. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून याची सर्वस्वी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांची आहे. गुन्हेगारांवर कारवाई होत नाही, पोलीस प्रशासनावर मंत्र्यांचा आरोप आहे. माझ्यावर हल्ला झाला हा माझा सन्मान समजतो कारण मी महापुरुषांच्या विचारांचा प्रसार, प्रचार करतो" असंही प्रविण गायकवाड यांनी सांगितले. पंढरपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
(नक्की वाचा- Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर हल्ला, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world