Chandrapur News: वादानंतर संताप अनावर; बायकोने केली नवऱ्याची गळा आवळून हत्या

Chandrapur News : दुर्वास बाबूराव चौधरी असे  मृत व्यक्तीचे नाव आहे तर  वैशाली दुर्वास चौधरी असे  आरोपी पत्नीचे नाव आहे. आरोपी महीलेस पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर

Chandrapur News : बायकोने नवऱ्याची गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या जामसाळा नवीन या गावात ही घटना घडली आहे. सिंदेवाही पोलीसांत आरोपी पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

दुर्वास बाबूराव चौधरी असे  मृत व्यक्तीचे नाव आहे तर  वैशाली दुर्वास चौधरी असे  आरोपी पत्नीचे नाव आहे. आरोपी महीलेस पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मृतकाच्या आई सुनंदा बाबुराव चौधरी यांनी पोलिसांत तक्रार दिली. दारूचे व्यसन त्यात पतीसारखा चारित्र्यावर संशय घेत होता. यातून दररोज त्यांचे खटके उडायचे. या प्रकाराला वैतागून पत्नीने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. 

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाचा 11 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार; नागरिकांनी दिला चोप)

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात येणाऱ्या जामसाळा गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाबुराव चौधरी याला दारुचे व्यसन होते. त्यात तो पत्नी वैशाली हिच्या चरित्र्यावर संशय घेत होता. यातून त्यांच्यात नेहमी वाद होत असे. शनिवारी देखील त्यांच्यात असाच वाद झाला आणि झटापटीही झाली. 

(ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: टार्गेट अहमदाबाद, उद्देश दहशतवाद? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही?)

या वादादरम्यान वैशालीला संताप अनावर झाला. रागाचा भरात तिने रुमालाने गळा आवळून पतीचा जीव घेतला.या घटनेने गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून सिंदेवाही पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article