जाहिरात

Air India Plane Crash: टार्गेट अहमदाबाद, उद्देश दहशतवाद? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही?

बोईंग 787 आणि बोईंग 737 चे सोर्स कोड लीक झाल्याची चर्चाही 2019 मध्ये झाली होती.

Air India Plane Crash: टार्गेट अहमदाबाद, उद्देश दहशतवाद? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही?

अहमदाबादमध्ये विमानाचा एवढा भयंकर अपघात झालाच कसा? या प्रश्नाचा सध्या युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.  हा तपास सुरू असतानाच एक नवा अँगल समोर आला आहे. तो अँगल म्हणजे विमान अपघात हा दहशतवादी हल्ला होता का? कारण या अपघाताचा NIA म्हणजेच नॅशनल इनव्हेस्टिगेटीव्ह एजन्सीकडून तपास केला जात आहे.  NIA ही यंत्रणा दहशतवादी कारवायांबद्दल तपास करते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

देशाला दहशतवादापासून सुरक्षित ठेवणं हे NIA चं मुख्य उद्दिष्ट आहे. विमान अपघात हा खरंच दहशतवादी हल्ला होता का, या दृष्टीनं तपास करताना पहिला प्रश्न होता तो म्हणजे या अपघाताचा व्हिडीओ कुणी काढला. अहमदाबादमध्ये आर्यन नावाच्या सतरा वर्षांच्या मुलानं हा व्हिडीओ शूट केला. हा मुलगा दोन तासांपूर्वीच अहमदाबादमध्ये आला होता. त्याच्या गावातल्या मित्रांना विमानांचे व्हिडीओ दाखवण्यासाठी त्यानं विमानाचे व्हिडीओ शूट केल्याची माहिती आहे. व्हिडीओ शूट केल्यानंतर त्यानं त्याच्या वडिलांना व्हिडीओ पाठवला. या मुलाचीही चौकशी करण्यात आलीय .

ट्रेंडिंग बातमी - Jalgaon News: पत्नीला कारखाली फरफटत नेत, अंगाची कातडी सोलली, हैवान पतीचा भयंकर 'कार'नाम!

अहमदाबादच्या विमान अपघाताबद्दल संशय वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे अमेरिकेच्या सारा अॅडम्स या लेखिकेचं ट्विट. सारा अॅडम्स या अमेरिकेतल्या लेखिकेनं 9 जूनला म्हणजे अपघाताआधी तीन दिवस एक ट्विट केलं होतं. त्यात ती म्हणते की,भारत कल्पनाही करू शकणार नाही असा सगळ्यात मोठा हल्ला भारताच्या जमिनीवर होणार आहे. आणि या हल्ल्याचा कट अफगाणिस्तानात रचला गेल आहे. पुढे त्या गुड लक असं ही म्हणतात. 

ट्रेंडिंग बातमी - Plane crash News: नेपाळची मुलगी, बिहारमध्ये शिकली, विमान कंपनीत कमाला लागली, पण पुढे भयंकर शेवट

हे भाकीत वर्तवणाऱ्या या सारा अॅडम्स कोण आहेत? याचा शोध घेतला तर सारा अॅडम्स ही अमेरिकेतली लेखिका आहे. तिचा CIA शी संबंध असल्याचं कळतंय. दहशतवादी अँगलनं तपासातला पुढचा मुद्दा म्हणजे सायबर हॅकिंग करुन असं विमान पाडणं शक्य आहे का? द वायर या प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये ऑगस्ट 2019 मध्ये एक आर्टिकल छापण्यात आलं होतं. त्यामध्ये  जर्मनीमधला सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट रुबेन सँटामार्टानं एक दावा केला होता. बोईंग 787 ची सिस्टीम सायबर हॅकिंग करुन घातपात घडवला जाऊ शकतो, असा त्याचा दावा होता.

ट्रेंडिंग बातमी - Beed News: 13 वर्षांची मुलगी, 30 वर्षांचा नवरा, एकाच मांडवात दोघांशी लग्न, पुढे जे घडलं ते...

बोईंग 787 आणि बोईंग 737 चे सोर्स कोड लीक झाल्याची चर्चाही 2019 मध्ये झाली होती. टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळी हॅकिंगची शक्यता जास्त असते, असा दावाही त्यावेळी करण्यात आला होता. तसंच फ्लाईटमधल्या एन्टरटेन्मेंट सिस्टीमच्या माध्यमातून विमान हॅक केलं जाऊ शकतं, असाही तज्ज्ञांचा अंदाज होता. नंतर बोईंगनं हे सगळे दावे फेटाळले होते. अहमदाबाद अपघातानंतर आकाश वत्स या तरुणानं याच विमानाबद्दलचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामध्ये या विमानातली एन्टरटेन्मेंट सिस्टीम चालत नसल्याचा दावा त्यानं केला होता.

ट्रेंडिंग बातमी - Plane crash News: कॉकपिटजवळची सीट सर्वात सुरक्षित का? 1993 च्या अपघातात वाचलेल्या प्रवाशाचा भयंकर अनुभव

अहमदाबाद -लंडन विमानाचा पायलट सुमीत सब्रवालला जवळपास 9 हजार तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. सुमीत सबरवाल स्वतः इतर पायलटना ट्रेनिंग द्यायचा. तसंच विमानाची उड्डाण क्षमताही आधी तपसाण्यात आली होती. असं असतानाही विमानाचा असा अपघात धक्कादायक आहे. म्हणूनच दहशतवादी हल्ल्यासह सगळ्याच बाजूंनी याचा तातडीनं तपास होण्याची गरज व्यक्त होत आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com