मेंढपाळाच्या पालावरच महिलेची प्रसूती, नंतर बैलगाडीत टाकलं अन्...

पालावरच गर्भवती महिलेची सुरक्षित प्रसूती करण्यात आली. महिलेनं गोंडस मुलीला जन्म दिला.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाशिम:

वाशिम जिल्ह्यातील इंझोरी शेत शिवारात पाल ठोकून राहत असलेल्या मेंढपाळ महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि आशा वर्कर यांना ही माहिती देण्यात आली. त्यांनीही पालाच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर  पालावरच गर्भवती महिलेची सुरक्षित प्रसूती करण्यात आली. महिलेनं गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसूतीनंतर मात्र आई आणि बाळाची प्रकृती चिंताजन झाली. रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. अशा वेळी दोन किलोमीटर बैलगाडीतून हा दोघींनाही प्रवास केला. त्यानंतर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास सास कंट्रोल रूमच्या अजय ढोक यांना फोनवर माहिती मिळाली की एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत आहेत. तिची प्रकृती गंभीर आहे. अजय ढोक यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  शारदा वेरूळकर यांना संपर्क साधला. ज्या ठिकाणी महिला होती त्या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हात. अशा वेळी दोघांनी घटनास्थळी जाण्यासाठी दुचाकीचा उपयोग केला. तिथे पोहोचेपर्यंत त्यांना रस्त्यात अनेक अडचणी आल्या. शेवटी ते त्या पालावर पोहोचले. 

ट्रेंडिंग बातमी - खातेवाटपावरून महायुतीत ओढाताण? गृहच्या बदल्यात 'हे' खातं देण्याची भाजपची तयारी

पालावर पोहोचल्यानंतर, त्या महिलेची तिथेच प्रसूती करण्यात आली. महिलेनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, बाळ आणि आईची प्रकृती त्यानंतर चिंताजनक झाली. त्यांना रूग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. पण रुग्णालयापर्यंत पोहोचायचे कसे असा प्रश्न होता. तिथे जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हात. अशा वेळी दोन किलोमिटर कच्च्या रस्त्याने प्रवास करावा लागणारहोता. अशा वेळी  बैलगाडीतून मुख्य रस्त्यावर त्या दोघींना आणण्यात आले. 

ट्रेंडिंग बातमी - एकनाथ शिंदेंचं मन फडणवीसांनी कस वळवलं? पडद्यामागे काय घडलं? NDTV मराठी Exclusive

दोन किलोमिटर बैलगाडीतून प्रवास केल्यानंतर त्या मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्या. तिथून 102 रुग्णवाहिकेद्वारे त्यांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या बरोबर अजय ढोक, शारदा वेरूळकर, डॉक्टर शेख आणि स्थानिक आशा वर्कर सुनिता राठोड होत्या. प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी महिला मोठी मदत केली. त्यांमुळे त्यांचेही सध्या कौतूक होत आहे. प्रसुती झालेल्या महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे. वेळीच तिला मदत मिळाली. त्यामुळे नवजात मुलगी आणि आईला उपचार मिळण्यास मदत झाली.  
 

Advertisement