सागर कुलकर्णी
एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होणार की नाही? ते उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार की नाही? हे शेवटच्या क्षणापर्यंत ठरत नव्हतं. शपथविधीला काही तास शिल्लक असताना याबाबतचा निर्णय झाला. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी हा निर्णय घ्यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागे सुत्र हलवली होती. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलं. शिवाय फडणवीसांनी आपला अनुभवही शिंदेंना सांगितला. आपल्या जवळच्या नेत्यालाही शिंदेंची भेट घ्यायला लावली. शेवटी शिंदे तयार झाले आणि महायुती समोरील मोठा पेच सुटला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात असलं पाहीजे असं देवेंद्र फडणवीस यांना वाटत होतं. संघटनेसाठी काम करत असताना सत्तेत राहणं कित आवश्यक आहे हे फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना समजवून सांगितलं होतं. आपणही 2022 साली संघटनेचं काम करण्याचं ठरवलं होतं. पण पक्षश्रेष्ठींनी आपल्याला उपमुख्यमंत्री होण्यास सांगितलं. त्यांचा हा निर्णय योग्य होता. त्यामुळे तुम्ही सत्तेत राहून संघटनेसाठी काम करा असं फडणवीसांनी शिंदेंना सांगितलं. त्याचा नक्की फायदा होईल असंही सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - खातेवाटपावरून महायुतीत ओढाताण? गृहच्या बदल्यात 'हे' खातं देण्याची भाजपची तयारी
ज्यावेळी विधानसभा निवडणुकीचा निकाला लागाला. त्यानंतर दिल्लीवारी दरम्यान भाजप श्रेष्ठींनी शिंदेंना मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल असं स्पष्ट पणे सांगितलं होतं. शिवाय त्याच वेळी शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यावे लागेल असे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबई आले. पण महायुतीची कोणतीही बैठक मुंबईत झाली नाही. शिंदे हे साताऱ्याला त्यांच्या मुळे गाळी नरे इथे गेले. प्रकृती ठिक नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी वेगवेगळ्या बातम्या बाहेर येत होते. एकनाथ शिंदे नाराज आहे असंही बोललं जात होते. अशा वेळी फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या सतत संपर्कात होते. त्यांच्या प्रकृतीचीही फडणवीसांनी चौकशी केली.
ट्रेंडिंग बातमी - 'पक्षाने माझी किंमत केली पाहिजे' भाजपचे सर्वात सिनिअर आमदार थेट बोलले
पुढे मुळगावा वरून शिंदे ठाण्याला परत आले. नंतर ते ठाण्याच्या रुग्णालयातही दाखल झाले होते. तिथून त्यांनी थेट वर्षा निवासस्थान गाठलं होतं. त्याच वेळी फडणवीसांनी आपले खास गिरीश महाजन यांना शिंदेंच्या भेटीसाठी पाठवले. त्यावेळी काही प्रमुख खात्याबाबत त्यांची चर्चा ही झाली. त्यावेळी शिवसेनेला गृह खातं मिळालं पाहीजे अशी भूमीका मांडली जात होती. शिवाय ही मागणी करत इतर चांगली खाती पदरात कशी पडतील अशी रणनिती शिवसेनेची होती. पण देवेंद्र फडणवीस गृह खातं स्वताकडे ठेवतील. ते खातं सोडणार नाहीत. याची पुर्ण कल्पना एकनाथ शिंदे यांना होती. त्यामुळेच त्यांनी इतर महत्वाची खाती आपल्याला कशी मिळतील यासाठी दबाव वाढवला होता अशीही चर्चा होती.
ट्रेंडिंग बातमी - काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल, राज्यसभेत मोठा गदारोळ; भाजप आक्रमक
या सर्व चर्चा गिरीष महाजन यांच्या माध्यमातून होत होत्या. शिवाय फडणवीसही शिंदेंच्या संपर्कात होते. भाजपचा विधीमंडळ पक्षनेता निवडण्या आधी फडणवीसांनी थेट वर्षा बंगला गाठला होता. त्यावेळी फडणवीस आणि शिंदे यांच्यात संवाद ही झाला. यावेळी फडणवीसांनी शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सत्तेत राहीलं पाहीजे. सत्तेत राहून संघटना वाढवली पाहीजे. 2022 मध्ये पक्ष्याच्या पूर्णवेळ कामाची भूमिका आपण घेतली होती, असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं. आपणही सरकारमध्ये सहभागी होणार नव्हतो.
पण दिल्लीतल्या नेत्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्याचा आग्रह केला होता. त्यांनी दिलेला आदेश आपण पाळला. पक्षश्रेष्ठींचा निर्णय किती योग्य होता हे कालांतराने समजले. आपला हा अनुभव यावेळी फडणवीसांनी शिंदे यांना सांगितला. त्यामुळे तुम्ही सत्तेत राहा आणि संघटनाही वाढवा. त्याच वेळी शिंदे यांनी फडणवीसांच्या सरकारमध्ये सहभागी होण्यास होकार दिला होता. त्यानंतरच फडणवीस यांनी शिंदे यांच्या सहमतीचे पत्र राज्यपालांकडे दिले होते. शिंदे यांच्या पक्षातील काही लोकांना मात्र मुख्यमंत्रिपद मिळत नसेल तर सत्तेत थेट जायला नको. पण इतर काही आमदारांनी सत्तेत गेले पाहीजे असा आग्रह धरला. शिवाय फडणवीसांचा अनुभव आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची नाराजी नको त्यामुळे अखेर शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्याची तयारी दर्शवली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world