karjat News: वडापावच्या ऐवजी प्रवाशाला मिळाला साबण पाव! तक्रारीनंतर कर्जत स्टेशनवरील दुकान बंद

Karjat Railway Station News: एका महिलेने कर्जत स्टेशनवर घेतलेल्या वडापावमध्ये चक्क साबण आढळल्याची तक्रार केली आहे. काय आहे हे नेमके प्रकरण? जाणून घ्या... 

जाहिरात
Read Time: 2 mins

कर्जत:  प्रवासादरम्यान बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्याचा मोह आवरता येत नाही. बस प्रवासात, रेल्वे प्रवासात आपण बाहेरचे पदार्थ खातो मात्र असे पदार्थ खाताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण एका महिलेने कर्जत स्टेशनवर घेतलेल्या वडापावमध्ये चक्क साबण आढळल्याची तक्रार केली आहे. काय आहे हे नेमके प्रकरण? जाणून घ्या... 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्जत स्टेशनवर असलेल्या 2 नंबर प्लॅटफॉर्मवरील व्ही.के.जैन टी स्टॉल नावाचे दुकान आहे. याठिकाणी चहा, कॉफी, वडापाव, भजीसह समोसा, इडली, सारखे नाश्त्याचे पदार्थ मिळतात. स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी याठिकाणी पाहायला मिळते. मात्र एका प्रवासी महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आता हे दुकान बंद करण्यात आले आहे. 

(नक्की वाचा- Shivsena vs MNS : गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय? शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा)

कर्जत स्टेशनवर असलेल्या व्ही.के.जैन टी स्टॉलवरुन एका महिलेने वडापाव घेतला होता. ही महिला खोपोलीला राहणारी असून या महिलेने तक्रार केली आहे की वड्यामध्ये बटाट्याच्या सारणात साबणाचा तुकडा होता. या महिलेने स्टेशन मॅनेजरकडे यासंदर्भात तक्रार केली होती. 1 एप्रिल रोजी हा प्रकार घडला. या तक्रारीची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून सदर स्टॉल बंद करण्यात आला आहे. या स्टॉलभोवती हिरव्या रंगाचे जाळीदार कापड लावून तो बंद करण्यात आला आहे.

Beed News: अजित पवार बीडमध्ये, पण धनंजय मुंडे कुठे आहेत ? कारणासोबत ठिकाणही कळालं