Davos 2025: परळीकरानं फडकावली दावोसमध्ये पताका ! राज्य सरकारशी केला मोठा करार

Davos 2025:  बीड जिल्ह्यातल्या परळीचं नावं सध्या राज्यात गाजत आहे. विशेषत: परळी तालुक्यातील राजकारण हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरलं आहे. त्याचवेळी परळीकरांना अभिमान वाटावी अशी गोष्ट घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Davos 2025:  बीड जिल्ह्यातल्या परळीचं नावं सध्या राज्यात गाजत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि विशेषत: परळी तालुक्यातील राजकारण हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरलं आहे. त्याचवेळी परळीकरांना अभिमान वाटावी अशी गोष्ट घडली आहे. परळीतील  भरत गीते यांच्या टॉरल इंडिया कंपनीचा दावोस मध्ये महाराष्ट्र शासनाशी करार झाला आहे. परळीचे आमदार तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भरत गीते यांच्या टॉरल इंडिया या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुपा व अहिल्यानगर या ठिकाणी अत्याधुनिक ॲल्युमिनियम कास्टिंग सोल्युशन निर्माण करून ते जगभरात निर्यात करता येईल अशा पद्धतीचे प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी 500 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली जाणार असून 1200 पेक्षा अधिक रोजगारांची याद्वारे निर्मिती होणार आहे. 

( नक्की वाचा : Davos 2025: दावोसमध्ये MMRDA ची गरुडझेप, 40 अब्ज डॉलर्सचे केले करार, वाचा कसा होणार फायदा! )

परळीच्या भूमिपुत्राची कंपनी सुपा आणि अहिल्यानगर येथे दोन प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पातून बाराशेपेक्षा जास्त जणांना रोजगार निर्मिती होणार आहे, असं मुंडे यांनी सांगितलं. 

मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या परळी तालुक्यातील नंदागौळ या छोट्याशा गावचे सुपुत्र असलेले भरत गीते यांनी आंतरराष्ट्रीय दर्जावर आपल्या कंपनीची छाप उमटवली आहे. या कंपनीनं महाराष्ट्रमध्ये दोन प्रकल्प उभारत रोजगार निर्मितीत तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत असल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी अभिमान आणि आनंदाचा हा क्षण असल्याची भावना व्यक्त केली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article