जाहिरात

Davos 2025: दावोसमध्ये MMRDA ची गरुडझेप, 40 अब्ज डॉलर्सचे केले करार, वाचा कसा होणार फायदा!

Davos 2025: दावोसमध्ये MMRDA ची गरुडझेप, 40 अब्ज डॉलर्सचे केले करार, वाचा कसा होणार फायदा!
मुंबई:

स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्यात विक्रमी गुंतवणूक करण्यात महाराष्ट्राला यश आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्राच्या शिष्टमंडळानं वेगवेगळे सामंजस्य करार या परिषदेत केले आहेत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानाचं (MMRDA) चं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. एमएमआरडीएच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांत 11 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. 40 अब्ज डॉलर्सचे (3.5 लाख कोटी रुपये) 11 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार या परिषदेमध्ये करण्यात आले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या गुंतवणुकींमुळे मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) पायाभूत सुविधांच्या विकासात आमूलाग्र बदल होणार आहे. शहरी वाहतूक, प्रादेशिक विकास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये होणारी ही गुंतवणूक पुढील 3 ते 5 वर्षांत आर्थिक वाढीचा आणि जीवनमान सुधारण्याचा भक्कम आधारस्तंभ ठरणार आहे.

महत्त्वाचे सामंजस्य करार  


1) कंपनीचे नाव : क्रॉसरेल इंटरनॅशनल (यूके) + यूके वाहतूक विभाग  
सामंजस्य करार : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक पायाभूत सुविधांचा विकास आणि कार्यक्षमतेतील सुधारणा  
एकूण गुंतवणूक : धोरणात्मक अभ्यासासाठी सहाय्य  

2) कंपनीचे नाव: यूनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅम सेंटर फॉर रेल्वे रिसर्च अँड एज्युकेशन, यूके  
सामंजस्य करार : मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) शाश्वत शहरी वाहतूक साध्य करणे  
एकूण गुंतवणूक: धोरणात्मक अभ्यासासाठी सहाय्य  

3) कंपनीचे नाव: ब्रुकफिल्ड कॉर्पोरेशन (कॅनडा)  
सामंजस्य करार : शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे  
एकूण गुंतवणूक: 12 अब्ज डॉलर्स  

4) कंपनीचे नाव: ब्लॅकस्टोन इन्क. (यूएसए)  
सामंजस्य करार: शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशाततील आर्थिक वाढीस चालना देणे  
एकूण गुंतवणूक: 5 अब्ज डॉलर्स  

5) कंपनीचे नाव : टेमासेक कॅपिटल मॅनेजमेंट पीटीई लिमिटेड (सिंगापूर)  
सामंजस्य करार : शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे.
एकूण गुंतवणूक : 5 अब्ज डॉलर्स  

6) कंपनीचे नाव : सुमिटोमो रियल्टी अँड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (जपान)  
सामंजस्य करार : शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे.
एकूण गुंतवणूक : 5 अब्ज डॉलर्स

 
7) कंपनीचे नाव : हिरानंदानी ग्रुप (भारत + दुबई)  
सामंजस्य करार : शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे  
एकूण गुंतवणूक: 6 अब्ज डॉलर्स  

8) कंपनीचे नाव : के. रहेजा कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड (भारत + सिंगापूर)  
सामंजस्य करार: शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे  
एकूण गुंतवणूक : 5 अब्ज डॉलर्स  

9) कंपनीचे नाव: एव्हरस्टोन ग्रुप (सिंगापूर)  
सामंजस्य करार: शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे  
एकूण गुंतवणूक : 1 अब्ज डॉलर्स  

10) कंपनीचे नाव : सोतेफिन भारत प्रायव्हेट लिमिटेड (भारत + स्वित्झर्लंड)  
सामंजस्य करार: एमएमआरमध्ये पार्किंग सोल्यूशन्समध्ये बदल घडवून आणण्यासाठी थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे  
एकूण गुंतवणूक : 1 अब्ज डॉलर्स

11) कंपनीचे नाव : एमटीसी बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड + मित्सुई (भारत + जपान)  
सामंजस्य करार : मुंबई महानगर प्रदेशात सर्क्युलर इकॉनॉमी पार्क विकसित करणे  
एकूण गुंतवणूक : सर्क्युलर इकॉनॉमी  सहाय्य

( नक्की वाचा : दावोसमध्ये इतिहास घडला! दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्रासाठी मोठे करार, गुंतवणुकीचा नेमका आकडा किती? )

 विकासाचा उत्सव - मुख्यमंत्री 

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममुळे मुंबई महानगर प्रदेशासाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे. एमएमआरला ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट यामध्ये सामावले आहे. या भागीदाऱ्यांमुळे केवळ पायाभूत सुविधांचा विकास होणार आहेच, त्याचप्रमाणे या प्रदेशातील रोजगार निर्मिती आणि आर्थिक शाश्वततेलाही चालना मिळेल. एमएमआरडीएच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उत्सव साजरा करताना, हा खऱ्या अर्थाने 'विकासाचा उत्सव' आहे, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com