उंची केवळ 3 फूट आणि लांबी फक्त 6 फूट. वय जेमतेम 2 वर्ष 9 महिने. हे वर्णन दुसरं तिसरं कुणाचं नाही तर जगातल्या सर्वात बुटक्या म्हशीचं आहे. राधा नावाची ही म्हैस सध्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरली आहे. हे प्रदर्शन सध्या सोलापूर इथं सुरू आहे. राधा नावाही ही म्हैस जगातील सर्वात बुटकी म्हैस असल्याचा दावा या म्हशीचे मालक अनिकेत बोराट यांनी केला आहे. या म्हशीची विशिष्ठ्ये पाहाल तर तुम्ही ही आवाक व्हाल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनिकेत बोराट या म्हशीचे मालक आहेत. ते मुळचे सातारा जिल्ह्यातील माणचे रहिवाशी आहे. त्यांच्याकडे या राधा म्हशीचा जन्म झाला. जन्मापासून या म्हशीची उंची वाढलीच नाही. ती केवळ तीन फूट उंचीची आहे. तर लांबी जेमतेम सहा फूट आहे. ही मोर जातीची म्हैस आहे. या म्हशीची जात पंजाब हरियाणा या भागात आढळतात. पण या म्हशीचा जन्मा साताऱ्यात झाला. सुरूवाती पासूनच राधा वेगळी वाटत होती. पण तिच वय वाढत गेलं पण तिची उंची मात्र तेवढीच राहीली. तिचे वय आता दोन वर्ष नऊ महिने आहे.
जगातली ही सर्वात बुटकी म्हैस असल्याचा दावा अनिकेत यांनी केला आहे. त्यांनीही याबाबत माहिती घेतली. पण येवढी बुटकी म्हैस त्यांना कुठेही आढळून आलेली नाही. सोलापूर शहरातील होम मैदानावर हे कृषी प्रदर्शन आयोजन करण्यात आलं आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये ही राधा बुटकी म्हैस सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरत आहे. कृषी प्रदर्शनातील या लाडक्या राधाला तब्बल साडेतीन लाख रुपयांना विकतही मागण्यात आलं आहे. अनेक शेतकरी या प्रदर्शनला भेट देत आहेत. त्यावेळी ते राधाला पाहाण्यासाठी नक्की येत आहेत. त्यातूनत अनेक जण तिला विकत घेण्याची इच्छा व्यक्त करत आहे.
मात्र कितीही किंमत आली तरी आम्ही राधाला विकणार नसल्याचं तिच्या मालकांनी म्हटलं आहे. या राधाची तिचे मालक आपल्या मुला प्रमाणे काळजी घेतात. वेळच्या वेळ तिला खुराक दिला जातो. ही म्हैस जास्तीत जास्त लोकांना पाहात यावी या उद्देशाने अनेक कृषी प्रदर्शनात तिला घेवून गेले जाते. तिला पाहाणाऱ्यांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळतो असं अनिकेत सांगतात. आता ही राधा म्हैस आमच्या कुटुंबाचा हिस्सा झाल्याचंही ते सांगतात.