केसांची चांगली वाढ होण्यासाठी ब्युटी केअर रुटीनमध्ये कोणत्या तेलाचा समावेश करावा, याबाबत माहिती जाणून घेऊया. घरच्या घरी नैसर्गिक तेल तयार करण्याची ही रेसिपी अतिशय सोपी आहे.
नैसर्गिक तेल तयार करण्यासाठी एक कप नारळाचे तेल, दोन चमचे ऑलिव्ह ऑइल, एक चमचा मेथीचे दाणे, कढीपत्त्याची काही पानं, दोन चमचे कांद्याचा रस आणि एक चमचा आवळा पावडर
आता एका पॅनमध्ये नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑइल गरम करत ठेवा. यानंतर तेलामध्ये मेथीचे दाणे, कढीपत्ता आणि आवळा पावडर मिक्स करा. सर्व सामग्री पाच मिनिटे उकळू द्यावी.