Faster Hair Growth Tips: केसांची होईल भराभर वाढ, फक्त या नैसर्गिक तेलाचा करा वापर
Faster Hair Growth Tips: केसांची भराभर वाढ होण्यासाठी ब्युटी केअर रुटीनमध्ये कोणत्या तेलाचा समावेश करावा.
-
केसांची चांगली वाढ होण्यासाठी ब्युटी केअर रुटीनमध्ये कोणत्या तेलाचा समावेश करावा, याबाबत माहिती जाणून घेऊया. घरच्या घरी नैसर्गिक तेल तयार करण्याची ही रेसिपी अतिशय सोपी आहे. -
नैसर्गिक तेल तयार करण्यासाठी एक कप नारळाचे तेल, दोन चमचे ऑलिव्ह ऑइल, एक चमचा मेथीचे दाणे, कढीपत्त्याची काही पानं, दोन चमचे कांद्याचा रस आणि एक चमचा आवळा पावडर -
आता एका पॅनमध्ये नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑइल गरम करत ठेवा. यानंतर तेलामध्ये मेथीचे दाणे, कढीपत्ता आणि आवळा पावडर मिक्स करा. सर्व सामग्री पाच मिनिटे उकळू द्यावी. -
गॅस बंद करून तेल थंड होऊ द्यावे. तेल थंड झाल्यानंतर त्यामध्ये कांद्याचा रस मिक्स करावा आणि तेल गाळून एका बाटलीमध्ये भरावे. -
आठवड्यातून दोन ते तीन वेळा तेल स्कॅल्पवर लावा आणि पाच मिनिटे मसाज करावा. -
तेल कमीत कमी चार ते पाच तास स्कॅल्पवर राहू द्यावे, यानंतर सौम्यू शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावे. -
काही दिवसांतच केसांमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतील आणि केसांची वाढही होईल. -
कारण या नैसर्गिक तेलामुळे स्कॅल्पच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारेल आणि केस मुळासकट मजबूत होतील, ज्यामुळे केसांची चांगली वाढ होईल.
Advertisement
Advertisement
Advertisement