जाहिरात

CM Fadnavis in Davos : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली क्लॉस श्वाब यांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लॉस श्वाब यांची भेट घेतली. ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली. 2024मध्ये गणेशोत्सवात क्लॉस श्वाब हे एका बैठकीसाठी मुंबईत आले होते. त्यावेळी 12 सप्टेंबर 2024 रोजी सपत्नीक त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी येऊन श्रीगणेशाची आरती केली होती.
  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे आयोजन दरवर्षी ज्यांच्या पुढाकारातून केले जाते, त्या क्लॉस श्वाब यांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.
  • हरित ऊर्जा, ईलेक्ट्रीक व्हेईकल, उद्योग जगतातील अनेक नवीन घडामोडींवर या दोघांमध्ये यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्राच्या विकासभरारीला त्यांनी यावेळी शुभेच्छाही दिल्या.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज होरॅसिसचे अध्यक्ष फ्रँक जर्गन रिक्टर यांचीही भेट घेतली. फ्रँक हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे माजी संचालक सुद्धा आहेत.
  • यावेळी महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार होणार आहे आणि विविध कंपन्यांसोबत बैठकाही होणार आहेत.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com