देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतलाय. एम्स हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेर श्वास घेतला.
काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयामध्ये सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी डॉ. सिंग यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.