IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा, काय आहे कारण?
शिवदीप लांडे हे शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत.
-
'सिंघम' म्हणून ओळखले जाणारे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता.
-
शिवदीप लांडे हे 2006 च्या बॅचचे बिहार केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. लांडे पूर्णिया रेंजचे आयजी अधिकारी होते, नुकतीच त्यांची या पदावर बदली झाली होती.
-
शिवदीप लांडे हे शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत.
-
कडक शिस्तीचे कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहेत.
-
शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्यानंतर ते राजकारणात येऊ शकतात, अशी चर्चा होती. मात्र आपण राजकारणात येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
-
शिवदीप लांडे यांना राजीनामा देताना वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले होते.
Advertisement
Advertisement