Maha Kumbh 2025: हात-गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळ, PM मोदींनी महाकुंभमध्ये कसे केले स्नान; पाहा PHOTOS
Maha Kumbh 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (5 फेब्रुवारी 2025) महाकुंभमध्ये स्नान केले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (5 फेब्रुवारी 2025) प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर स्नान केले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातामध्ये रुद्राक्षांच्या माळा होत्या.
-
स्नान करताना त्यांनी रुद्राक्षांच्या माळांनी नामजप देखील केले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गळ्यामध्येही रुद्राक्षाची माळ घातली होती.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते.
-
गंगा मातेला प्रणाम करत त्यांनी सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण केले.
-
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी हेलिकॉप्टरने अरैल घाटाजवळील हेलिपॅडवर पोहोचले.
-
हेलिपॅड पोहोचल्यानंतर तेथून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना बोटीने त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी घेऊन गेले.
-
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 डिसेंबर 2024 रोजी प्रयागराजला भेट दिली होती. त्यावेळेस पंतप्रधान मोदींनी 5,500 कोटी रुपयांच्या 167 प्रकल्पांचे लोकार्पण केले होते.
-
ज्यामुळे महाकुंभ मेळ्यादरम्यान सर्वसामान्य भाविकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध झाली.
-
दरम्यान प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यामध्ये 5 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 47.40 लाख लोकांनी गंगा आणि संगमामध्ये स्नान केले. तर 13 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभमध्ये मंगळवारपर्यंत (4 फेब्रुवारी) 38.29 कोटीहून अधिक लोकांनी संगमामध्ये स्नान केले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement