होमफोटोमुसळधार पावसामुळे मुंबई जलमय, दुर्घटना घडून चार जणांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय, दुर्घटना घडून चार जणांचा मृत्यू
मुंबईमध्ये बुधवारी (25 सप्टेंबर) मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना प्रवास करताना मनस्ताप सहन करावा लागला. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
मुंबईमध्ये बुधवारी (25 सप्टेंबर) मुसळधार पावसाने हजेरी लावली. संध्याकाळच्या वेळेस पावसाचा जोर वाढल्याने घरी परतणाऱ्या मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. कुर्ला परिसरामध्ये इतके पाणी साचले होते, चारचाकी वाहने अक्षरशः बुडाली होती.
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने प्रवाशांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान मुसळधार पावसामुळे वीज कोसळून तसेच काही ठिकाणी दुर्घटना घडून चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
रेल्वे ट्रॅकवरही पावसाचे पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली होती. कुर्ला, विक्रोळी, भांडूपसह अन्य स्टेशनवरही प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. (Photo Credit - ANI)
दरम्यान मुंबईत गुरुवारी (26 सप्टेंबर) सकाळी 8.30 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई शहरातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
IMDकडून मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात पुढील 24 तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.