जाहिरात

Mumbai Metro 3: मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रो कशी दिसते? पाहा PHOTOS

Mumbai First Underground Metro Line : मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 मार्गावरील पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

  • मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3च्या मार्गावरील पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.
  • आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ऑक्टोबर महिन्यामध्ये करण्यात येणार आहे.
  • पहिल्या टप्प्यामध्ये 12.44 किलोमीटरच्या अंतरावर मेट्रो धावणार आहे.
  • पहिल्यात टप्प्यात 10 स्थानकांचा समावेश असून यापैकी नऊ स्थानकं अंडरग्राऊंड आहेत. तर एक ग्रेड टर्मिनस स्टेशन असेल.
  • पहिल्या टप्प्यामध्ये 6 मिनिटे 50 सेकंदांच्या अंतराने मेट्रो चालवण्यात येतील. मेट्रोच्या प्रत्येक फेरीमध्ये अडीच हजार प्रवासी एका वेळेस प्रवास करू शकतात.
  • पहिल्या टप्प्यामध्ये नऊ गाड्यांसह मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही मेट्रो सेवा ड्रायव्हरलेस असणार आहे.
  • 2011मध्ये मेट्रोच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तेव्हा त्याची किंमत 23 हजार कोटी रुपये इतकी होती. यानंतर अनेक अडथळ्यांचा सामना करत हा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे.
  • आज मेट्रो-3 प्रकल्पाची किंमत 36 हजार कोटी रुपये इतकी झाली आहे.
  • मेट्रो-3 मार्गावरील पहिल्या टप्प्यामध्ये बीकेसी, वांद्रे कॉलनी, सांताक्रुझ मेट्रो, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टी 1, सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टी 2, मरोळ नाका, एमआयडीसी अंधेरी, सीप्झ, आरे आणि जेव्हीएलआर अशा 10 स्थानकांचा समावेश आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस T-2 आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल T-1 या स्टेशनची निर्मिती करण्यात आल्याने मेट्रो 3 मुळे मुंबईकरांना मुंबई विमानतळ अतिशय कमी वेळात गाठता येणार आहे.
  • मेट्रो ड्रायव्हरलेस असल्याने फायर सेफ्टी, मेट्रो, डोअर ओपनिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, एलिव्हेटर मॅनेजमेंटसह आपत्कालीन मदतीसाठी विशेष उपाययोजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल T-2 स्टेशनमध्ये 19 मीटर लांब एलिव्हेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. हा भारतामधील सर्वात मोठा एलिव्हेटर असल्याचे म्हटले जात आहे.
  • तसंच मरोळ नाका स्टेशनमधून मेट्रो 3 आणि मेट्रो 1ला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती एमएमआरसी संचालक अश्विनी भिडे यांनी दिली आहे.
  • मेट्रो 3 मुळे साडेचार लाख वाहनफेऱ्या दरदिवशी कमी होण्यास मदत होईल. तसेच 2031 पर्यंत ही संख्या साडेसहा लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अडीच लाख लिटर इंधनाची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे 2031 पर्यंत साडेतीन लाख लिटर इंधनाची बचत होण्यात मदत होईल.
  • मेट्रो 3मधील पहिल्या टप्प्याात किमान तिकीट 10 रुपये तर कमाल तिकीट 50 रुपये असेल, अशी माहिती आहे.
  • मेट्रो 3 मार्ग पूर्ण झाल्यानंतर कमाल तिकीट 70 ते 80 रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
  • Photo Credit - Bhagyashree Pradhan Acharya
Switch To Dark/Light Mode