Naga Chaitanya Sobhita Dhulipala Marriage : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा शुभविवाह
अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचा विवाहसोहळा बुधवारी (4 डिसेंबर) पार पडला.
-
अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचा लग्नसोहळा बुधवारी (4 डिसेंबर) तेलुगू रितीरिवाजांनुसार पार पडला.
-
हैदराबादमधील प्रतिष्ठित अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये नागा चैतन्य आणि शोभिताने लग्न केले.
-
चैतन्यचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत म्हटलंय की, "शोभिता आणि चैतन्यला एकत्र या सुंदर प्रवासाची सुरुवात करताना पाहणे हा माझ्यासाठी अतिशय खास तसचे भावनिक क्षण आहे. तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन. शोभिता तुझे कुटुंबात स्वागत आहे. तू आमच्या आयुष्यात याआधीच खूप आनंद आणला आहेस."
-
लग्नासाठी नागा चैतन्यने पारंपरिक पोशाख परिधान केला होता. तर शोभिताने सोन्याच्या जरीने तयार केलेली सुंदर कांजीवरम सिल्क साडी नेसली होती.
-
या लग्नसोहळ्यामध्ये चिरंजीवी, राम चरण, महेश बाबू, अल्लु अर्जुन, पीव्ही सिंधू, नयनतारा, अक्किनेनी, डग्गुबाती कुटुंब आणि एनटीआरसह कित्येक सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली. Photo Credit : Nagarjuna Akkineni X
Advertisement
Advertisement