Local holidays News: नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठागौरी विसर्जनाला कोणकोणाला सुटी जाहीर? सरकारने दिली माहिती
Local holidays News: नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठागौरी विसर्जनाला कोणकोणाला सुटी जाहीर करण्यात आलीय, वाचा माहिती...
-
नारळी पौर्णिमा सणानिमित्त महाराष्ट्र शासनाने 8 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय / निमशासकीय कार्यालयांना सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयांना देखील 8 ऑगस्ट 2025 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर महानगरपालिका कार्यालये, शाळा इत्यादी बंद राहतील.
-
यापूर्वी 18 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार 16 ऑगस्ट 2025 रोजी गोपाळकाला आणि 06 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली होती. पण गुरुवारच्या (7 ऑगस्ट) शासन शुद्धीपत्रकानुसार यामध्ये बदल करण्यात आले आहेत. नवीन बदलांनुसार गोपाळकाला आणि अनंत चतुर्दशीच्या सुट्या रद्द केल्या गेल्या आहेत. त्याऐवजी नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठागौरी विसर्जन या दोन दिवसांसाठी स्थानिक सुटी जाहीर केली गेलीय.