जाहिरात

बंडखोरांनी सीरियावर कब्जा केला, असादच्या महालाची काय अवस्था केलीय पाहा

सीरियातील बंडखोरांनी रविवारी (8 ऑक्टोबर) राजधानी दमिश्क ताब्यात घेतली. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांना जीव मुठीत धरून पळ काढावा लागला. यानंतर बंडखोरांनी सत्ता आपल्या ताब्यात घेतली.

  • सीरियामधील बंडखोर राजधानी दमिश्कमध्ये घुसले आणि त्यांनी कब्जा केला. सीरियातील राजवट त्यांनी उलथवून टाकली.
  • बंडखोरांनी दमिश्कवर ताबा घेण्याच्या आधीच सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांनी पळ काढला. असाद यांना रशियाने आश्रय दिलाय.
  • दमिश्कवर ताबा मिळवताच बंडखोर आणि सर्वसामान्य जनता असाद यांच्या महालात घुसली आणि त्यांनी मजबूत तोडफोड केली.
  • 2011 सालापासून असाद यांच्या सत्तेविरोधात आवाज उठण्यास सुरुवात झाली होती. सीरियात लोकशाही यावी, अशी मागणी केली जात होती.
  • सीरिया 2011पासून देशांतर्गत संघर्षामुळे होरपळला आहे. बंडखोरांचा बिमोड करण्यासाठी असाद यांनी रासायनिक शस्त्रास्त्रांनीही हल्ले केले होते.
  • युद्ध सुरू झाल्याने इराण, इराक, रशिया यासारख्या देशांचं सीरियावरील लक्ष कमी झालं आणि तेव्हापासून बंडखोरांनी अधिक ताकदीने सत्ता उलथवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
  • एक-एक शहरे ताब्यात घेत बंडखोरांनी अखेर दमिश्कही ताब्यात घेतले.
  • बंडखोरांनी बशर अल असाद यांचे वडील हाफीज अल असाद यांच्या पुतळ्याची तोडफोड केली आणि पुतळ्याच्या शिरावर पाय ठेवत फोटो काढले.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com