जाहिरात

Myanmar and Thailand Earthquake : भूकंपामुळे म्यानमार आणि थायलंड उद्ध्वस्त, अंगावर शहारे आणणारे PHOTOS

Myanmar and Thailand Earthquake : सुरुवातीला 7.5 रिश्टर स्केल आणि त्यानंतर 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे थायलंड आणि म्यानमारमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपामुळे प्रचंड आर्थिक नुकसानही झाले आहे.

  • बँकॉकमध्ये भूकंपाचे तीव्र स्वरुपाचे धक्के बसले आहेत. यानंतर रहिवासी इमारती, कार्यालये आणि दुकाने तातडीने रिकामे करण्यात आले आहेत.
  • नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार, सुरुवातीला 7.5 रिश्टर स्केल आणि त्यानंतर 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला.
  • अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाचे केंद्र सागाईंग शहरापासून 16 किलोमीटर उत्तर-पश्चिम दिशेला होते आणि त्याची खोली 10 किलोमीटर अंतरावर होती.
  • शक्तिशाली भूकंपाचे धक्के अनुभवल्यानंतर तेथील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये क्रेन असलेली बहुमजली इमारत कोसळताना दिसतेय.
  • रिपोर्ट्सनुसार नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.
  • ईशान्य भारत आणि चीनमधील काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.
  • म्यानमारमध्येही दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपाच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्ती केलीय.
  • "म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतरच्या परिस्थितीमुळे चिंतेत आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. या संदर्भात आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंडच्या सरकारांशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे", अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X पोस्टद्वारे दिलीय. Photos Credit : AP/PTI
Listen to the latest songs, only on JioSaavn.com