Pratap Sarnaik: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सरकारी अधिकाऱ्यांची पोलखोल, रिअॅलिटी चेकद्वारे मोठी माहिती उघड
Pratap Sarnaik: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सरकारी अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, मोठी माहिती समोर आणली.
-
Pratap Sarnaik Reality Check: राज्य सरकारच्या माध्यमातून बाइक टॅक्सी धोरण (Bike Taxi Poliy) जाहीर करण्यात आले आहे. पण कोणत्याही कंपनीला बाइक टॅक्स चालवण्यासंदर्भात अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही. असे असतानाही काही कंपन्यांकडून बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यात आलीय.
-
सरकारी अधिकाऱ्यांकडून 'कोणतीही अनधिकृत बाईक सेवा अस्तित्वात नाही' असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असल्याचे उघड झाले. अशा बेकायदेशीर सेवांवर तर कठोर कारवाई होणारच आहे, शिवाय चुकीची माहिती देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाईल.असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायद्याच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलणे, हीच शासनाची ठाम भूमिका आहे, असेही परिवहनमंत्र्यांनी म्हटलं. दरम्यान संबंधित चालकाचे नुकसान होऊ नये म्हणून परिवहनमंत्र्यांनी पाचशे रुपये देत मानवी संवेदनाही जपली. Photo Credit : Transport Minister Pratap Sarnaik Insta