Zakir Hussain : तबला वादक झाकीर हुसैन यांना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
Zakir Hussain : प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांना दिग्गजांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली.
-
भारतीय संगीताचे अद्वितीय रत्न, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित महान तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे, असे म्हणत भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली वाहिली. Photo Credit : Chandra Shekhar Aazad X
-
"कलाविश्वाचा ताल चुकला" अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली वाहिली. Photo Credit : PTI भारतीय अभिजात संगीताचा समृध्द खजिना सातासमुद्रापार दोन्ही हातांनी उधळणारे प्रतिभावान संगीतकार आणि तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे जाणे, संपूर्ण तालविश्वाचाच ताल चुकवणारे आहे. - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे