क्रिकेटर रिंकू सिंहसोबत साखरपुडा? कोण आहेत खासदार प्रिया सरोज?
प्रिया सरोज या उत्तर प्रदेशातील मछलीशहर लोकसभा मतदारसंघातून समाजवाजदी पक्षाच्या खासदार आहेत. अवघ्या 25 वर्षी त्या खासदार बनल्या आहेत.
-
क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा आहे. मात्र प्रिया सरोज यांच्या वडिलांनी चर्चांचं खंडन केलं आहे. दोघांच्या लग्नाबाबत चर्चा सुरु आहेत. लग्नाच विषय आहे म्हणून आम्ही विचारपूर्वक निर्णय घेणार असल्याचं प्रिया यांचे वडील तूफानी सरोज यांनी सांगितलं.
-
प्रिया सरोज या तीन वेळा खासदार आणि उत्तर प्रदेशच्या विद्यमान आमदार तुफानी सरोज यांच्या कन्या आहेत. तुफानी सरोज या उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या केरकट मतदारसंघातून आमदार आहेत.
-
प्रिया सरोज या उत्तर प्रदेशातील मछलीशहर लोकसभा मतदारसंघातून समाजवाजदी पक्षाच्या खासदार आहेत. अवघ्या 25 वर्षी त्या खासदार बनल्या आहेत.
-
प्रिया यांनी एअर फोर्स गोल्डन ज्युबिली इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली येथून शिक्षण पूर्ण केले. प्रिया सरोज याही वकील आहेत. लोकसभेच्या वेबसाइटनुसार, त्यांनी एमिटी युनिव्हर्सिटी, नोएडा येथून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे.
-
2024 च्या लोकसभा निवडणुकीत सरोज यांनी भाजपचे विद्यमान खासदार बीपी सरोज यांचा 35,850 मतांनी पराभव केला.
-
प्रिया सरोज या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाच्या संसदीय समितीच्या सदस्या आहेत.
-
निवडणूक आयोगानुसार, प्रिया यांच्याकडे एकूण 11.25 लाख रुपयांची मालमत्ता आहे. ज्यामध्ये प्रिया सरोज यांच्याकडे रोख 75,000 रुपये आहेत. प्रिया सरोज यांच्याकडे एकही कार नाही.
Advertisement
Advertisement
Advertisement