Abu Azmi News: 'नमाजसाठी बाहेर पडा, अंगावर रंग टाकला तर...' अबू आझमींचे थेट आवाहन

मुस्लीम समाजातील लोकांना नमाज पठणासाठी मस्जिदमध्ये जा असं अबू आझमी यांनी सांगितलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

सध्या रमजान सुरू आहे. त्यात शुक्रवारी जुम्मा. रमजान महिन्यात जुम्मा असतो, त्या दिवशी मस्जिदीमध्ये जाऊन नमाज पडणे हे पवित्र समजलं जातं. मात्र या वेळी जुम्मा आहे, त्याच दिवशी होळी आहे. अशा वेळी कुणी अंगावर रंग टाकला तर हा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी एक आवाहन केले आहे. त्यांनी मुस्लीम समाजातील लोकांना नमाज पठणासाठी मस्जिदमध्ये जा असं सांगितलं आहे. पण अंगावर कुणी रंग टाकला तर वाईट वाटून घेवू नका असं आवाहन केलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आम्हाला भाईचारा जपायचा आहे. परंतु काही लोक हिंदू मुस्लिम करत आहेत. आम्हीला शांतता हवी आहे, असं अबू आझमी म्हणाले. होळी खेळा पण भांडण काढण्यासाठी रंग टाकू नका, असं आवाहन ही त्यांनी केलं. जबरदस्ती कुणी कुणालाच छेडू नका असं ही ते म्हणाले. होळीच्याच दिवशी जुम्मा आहे. त्या दिवशी घरात नमाज पडता येणार नाही. त्यामुळे मस्जिदमध्ये नमाजसाठी जा. त्यावेळी कुणी अंगावर रंग टाकला तर रागवू नका. चिडू नका. वाईट वाटून घेवू नका असं आवाहन ही त्यांनी केलं.   

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Positive news: 'या' गावात गेल्या 7 वर्षापासून भोंगे बंदी, भोंगे बंदीचा फॉर्म्यूला काय?

यावेळी आझमी यांनी हिंदू बांधवांनाही आवाहन केलं. होळी नक्की खेळा. मोठ्या प्रमाणात खेळा पण कुणाला त्रास होणार नाही याची ही काळजी घ्या असं आवाहन त्यांनी केलं. कोणालाही छेडण्याच्या अनुषंगाने किंवा त्रास देण्याच्या अनुषंगाने रंग लावू नका असंही ते म्हणाले. सरकारच्या माध्यमातून दोन्ही समाजातील व्यक्तींना शुभेच्छा दिल्या पाहिजेत असं ही ते म्हणाले. दरम्यान प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाही असं ही त्यांनी सांगितलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Crime Story: इंस्टाग्रामवर मैत्री, लंडनवरुन तीनं दिल्ली गाठलं, पण इकडं येताचं भयंकर घडलं

दरम्यान उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी मस्जिदी झाकण्यात आल्या आहेत. त्यावर होळी असल्याने काळजी म्हणून असे केले असेल. रंग पडून उगाच वाद होवू नये ते टाळण्यासाठी हे पाऊल उचलले असेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हिंदू मुस्लीम काही जण करत आहे. ते टाळले पाहीजे. त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होईल. नितेश राणें यांची भाषणं भडकाऊ आहेत. त्यांच्यावर कोण कारवाई करणार असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे. 

Advertisement